विद्या बालनला आता डॉक्टर म्हणा!

By Admin | Updated: June 2, 2015 16:58 IST2015-06-02T16:58:53+5:302015-06-02T16:58:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला चित्रपटसृष्टीत केलेल्या योगदानाबद्दल गुजरातमधील एका इन्स्टिट्यूटने डॉक्टरेटची पदवी देवून सन्मानित केले आहे.

Vidya balan now doctor! | विद्या बालनला आता डॉक्टर म्हणा!

विद्या बालनला आता डॉक्टर म्हणा!

अहमदाबादमधील इन्स्टिट्यूटकडून विद्याचा डॉक्टरेट पदवी देवून सन्मान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला चित्रपटसृष्टीत केलेल्या योगदानाबद्दल गुजरातमधील एका इन्स्टिट्यूटने डॉक्टरेटची पदवी देवून सन्मानित केले आहे. केवळ विद्या बालन असे लिहिणा-यांना आता यापुढे डॉक्टर विद्या बालन असे लिहावे लागणार आहे हे मात्र नक्की.
अहमदाबाद स्थित असलेल्या इन्स्टिट्यूटने विद्या बालनचा डॉक्टरेट ही मानद पदवी देवून गौरव केला. बॉलिवूडमध्ये येवून आपल्याला दहा वर्षाचा कालावधी झाला अशावेळी आपला डॉक्टरेट पदवी देवून सन्मान केला जात आहे ही आपल्यासाठी खरोखर आनंदाची बाब असल्याचे विद्या बालन यांनी पदवी स्वीकारताना केलेल्या छोटेखानी भाषणात म्हटंले. 'परीनीता' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-या विद्या बालन हीने 'हम पांच' सारख्या छोट्या पडद्यावर सुध्दा काम केले आहे. अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना भेटलेली विद्या आता लवकरच तिच्या आगामी 'हमारी अधूरी कहानी' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Web Title: Vidya balan now doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.