तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:05 IST2021-01-23T04:05:37+5:302021-01-23T04:05:37+5:30

दोघांना अटक, शिवाजी नगर पोलिसांची कारवाई तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल दोघांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क ...

Video of young man being beaten goes viral | तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

दोघांना अटक, शिवाजी नगर पोलिसांची कारवाई

तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

दोघांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोवंडीत एका तरुणाला क्रूरतेने मारहाण सुरू असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच, पोलिसांनी गुन्हा नोंद करीत दोघांना शुक्रवारी अटक केली.

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस पीडित मुलाचे वडील वली मोहम्‍मद गौस शेख (वय ६८) यांच्यापर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचा मुलगा अक्रम हा नशेच्या अवस्थेत ११ जानेवारी रोजी आरोपी जमशेद अख्तर सय्यद ऊर्फ जंबो याच्या घरी गोंधळ घालत होता. यावेळी जमशेद यांच्यासोबत त्यांचे मित्र इरफान, राशीद जगा व अन्य तीन साथीदार तेथे हजर होते. यावेळी सहाजणांनी एकत्र येत त्याला घराशेजारील बाथरूमजवळ नेऊन लाकडी बांबू, काठीने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. जमशेद आणि इरफान कुरेशी यांना अटक करून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Video of young man being beaten goes viral