Join us

Video : आईच्या जुन्या साडीपासून रितेश देशमुख अन् त्याच्या मुलांचा दिवाळी ड्रेस

By महेश गलांडे | Updated: November 14, 2020 17:32 IST

दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बॉलिवूड सेलिब्रिटी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

ठळक मुद्देदिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बॉलिवूड सेलिब्रिटी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

मुंबई - अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन क्रिएटीव्ह गोष्टी करत असतो. काही दिवसांपूर्वी रितेशन आपल्या वडिलांचा कोट एका हाताने परिधान करत असलेला व्हिडिओ बनवला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता, रितेशने पुन्हा एकदा क्रिएटीव्ह व्हिडिओ बनवला आहे. विशेष म्हणजे रितेशने यंदाच्या दिवाळीला आईच्या जुन्या साडीपासून त्याच्यासाठी नवीन ड्रेस शिवला आहे. रितेशने त्याच्यासह त्याच्या दोन्ही मुलांनाही या साडीपासून ड्रेस शिवलाय. 

दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बॉलिवूड सेलिब्रिटी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता रितेश देशमुख याने एक खास व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. रितेश नेहमीच एका अनोख्या शैलीत चाहत्यांना शुभेच्छा देत असतो. दिवाळी निमित्तानेही त्याने असाच एक हटके व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख आपल्या दोन मुलांसह कुर्ता-पायजामा परिधान केलेला दिसत आहे. विशेष म्हणजे हे कपडे त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून तयार केले गेले आहेत. ''आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा”, असे कॅप्शन देत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

रितेशनने शेअर केलेल्या व्हिडिओत, त्याच्या आईने जुनी साडी फडकवल्यानंतर रितेशसह त्याच्या दोन्ह मुलांच्या अंगावर त्याचं रंगाचा कुर्ता दिसत आहे. रितेशने हे तिन्ही कुर्ते आईच्या जुन्या साडीपासूनच बनविल्याचे म्हटले आहे. नेटीझन्सला रितेशचा हा दिवाळी ड्रेस चांगलाच आवडला आहे. नेटीझन्सकडून या व्हिडिओचं आणि रितेशच्या आयडियाचं कौतुक होत आहे. सर्वसामान्य मुलांप्रमाणे अगदी कमी खर्चात रितेशने आपला दिवाळी पोशाष यंदा परिधान केलाय. 

टॅग्स :रितेश देशमुखदिवाळीमुंबईट्विटर