VIDEO : अनुष्काने प्रेस कॉन्फरन्स थांबवत उचलला रिपोर्टरच्या आईचा फोन
By Admin | Updated: March 13, 2017 15:47 IST2017-03-13T15:01:37+5:302017-03-13T15:47:03+5:30
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरू असलेल्या प्रेस कॉन्फ्रन्सदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सध्या अनुष्का चर्चेत आहे

VIDEO : अनुष्काने प्रेस कॉन्फरन्स थांबवत उचलला रिपोर्टरच्या आईचा फोन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपला आगामी चित्रपट फिलौरीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या अभिनयाबाबतच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरू असलेल्या प्रेस कॉन्फरन्सदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सध्या अनुष्का चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा आणि दिलजित दुसांज यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. अनुष्का आणि दिलजित मीडियाकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत होते. दरम्यान, ही परिषद सुरू असतानाच रेकॉर्डिंगसाठी समोर ठेवलेल्या रिपोर्टर्सच्या मोबाइलपैकी एक फोन वाजला. त्यावेळी खुद्द अनुष्काने हा फोन उचलला. त्यामुळे प्रेस कॉन्फरन्सही काही काळासाठी थांबवण्यात आली. एका रिपोर्टरला तिच्या आईचा फोन आला होता. अनुष्काने रिपोर्टरकडे फोन न देता स्वत:च तिच्या आईशी संवाद साधला. आंटीजी, तुमची मुलगी सध्या माझी मुलाखत घेत आहे, मुलाखत आटोपल्यावर ती तुम्हाला फोन करेल, असे अनुष्काने सांगितले.
अनुष्काचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यामुळे अनुष्काने जिचा फोन उचलला ती रिपोर्टर कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यामुळे अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या महिला रिपोर्टरचा व्हिडीओ शेअर केला आहे.