मुंबईतीलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात रेल्वेतील कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेल्या एका मोटरमनला खास अंदाजात निरोप देताना दिसत आहेत. हे पाहण्यासाठी प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सेवेतून निवृत्त झालेला मोटरमन आपल्या सहकाऱ्यांसोबत नाचत आहे. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीचा निरोप समारंभ पाहण्यासाठी मुंबईकरांनी सीएसएमटी स्थानकावर गर्दी केल्याची दिसत आहे. हा व्हिडिओ tag_mumbai या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिली आहे की, 'मध्य रेल्वे लोकल ट्रेनचा मोटरमन दीर्घ प्रवासानंतर निवृत्त झाला. मुंबईकरांनी त्याच्या सेवेतील शेवटचा प्रवास साजरा केला. त्याच्यामुळे लोक वेळत पोहोचले. त्याच्या सेवेबद्दल धन्यवाद.'
या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाल्या आहेत. तर, अनेकांनी भावनिक कमेंट केल्या आहेत. लोकांनी मोटरमनच्या सेवेबद्दल त्याचे आभार मानले आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कठोर परिश्रम करणाऱ्यांबद्दल मुंबईकरांना असलेले प्रेम आणि आदर हे दर्शवत आहे.