Join us

Video : आधी हाताला चटके... खासदार नवनीत राणा चुलीवर भाकरी भाजतात तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:51 IST

शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र सोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना चुलीवर भाकरी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

ठळक मुद्देट्विटरवर नवनीत कौर यांच्या नावाने एक अकाऊंट आहे. ज्या अकाऊंटवरुन त्यांच्या संदर्भातील बातम्या आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते. त्या अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मुंबई - अमरावतीच्याखासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. सध्या, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या दिल्लीतही आवाज उठवत आहेत.

शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र सोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना चुलीवर भाकरी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण, भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या राणा यांनी चुलीवर स्वयंपाक का केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेटीझन्सने याचा संदर्भात इंधन दरवाढीविरोधात जोडला आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलं नाही. 

ट्विटरवर नवनीत कौर यांच्या नावाने एक अकाऊंट आहे. ज्या अकाऊंटवरुन त्यांच्या संदर्भातील बातम्या आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते. त्या अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच, कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'खासदार नवनीत राणा संसदेच्या अधिवेशनात जनतेचा आवाज उठवत आहेत. तर, शनिवारी व रविवारी अमरावती येथे कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुटुंबीयांसाठी जेवण बनवत आहेत', असा आशय या व्हिडिओसह लिहिण्यात आला आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचा व्हिडिओ पाहून बहिणाबाई चौधरी यांच्या कांव्यपक्ती आठवल्याशिवाय राहणार नाही. अरे संसार संसार.. जसा तवा चुल्ह्यावर, आधी बसती चटके, मग मिळते भाकर.... या ओळी निश्चित आठवणीत येतील.  

टॅग्स :नवनीत कौर राणाअमरावतीखासदारव्हायरल फोटोज्