Join us  

Video:वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी करणाऱ्या 'त्या' उर्मट पोलिसावर अखेर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:22 PM

हेल्मेटशिवाय तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागतं. सिग्नल तोडून तुम्ही बाईक चालवाल तर दंड भरावाच लागतो मग हे सर्व नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का असा प्रश्न पडला असेल.

मुंबई - वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत सर्रासपणे दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हेल्मेटशिवाय तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागतं. सिग्नल तोडून तुम्ही बाईक चालवाल तर दंड भरावाच लागतो मग हे सर्व नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का असा प्रश्न पडला असेल. 

मुंबईतील गोरेगाव परिसरातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या आणि सिग्नल तोडून पुढे जाणाऱ्या पोलिसाला जाब विचारला असता त्या पोलिसाची मग्रुरी भाषा समोर आली आहे. हा पोलीस विनाहेल्मेट दुचाकी चालवतो आणि सिग्नल तोडतो याबाबत एका जागरुक तरुणाने विचारणा केली असता तो पोलीस अर्वाच्च भाषेत त्या तरुणाला उत्तर देताना व्हिडीओत दिसत आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असला तरीही पोलिसाची वर्दी घातली की त्यांना नियम वेगळे आहेत का असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांच्या मनात पडेल. 

पोलिसचं नियम तोडत असतील तर जाब कुणाला विचारायचा? याचं उत्तर कोणाकडे नाही. या व्हिडीओत तरुण पोलिसाला हेल्मेट कुठे आहे, तुम्ही सिग्नलही तोडला असं विचारणा केली असता त्या पोलिसाने तुला जाब विचारण्याचा अधिकार नाही, निघ इथून, मी सिग्नल मोडेन नाहीतर लोकांना उडवेन तु कोण विचारणारा? अशा उर्मट भाषेत पोलिसाने तरुणाला उत्तर दिले. या तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयात चांगलाच गाजतोय. 

या तरुण बाईकस्वाराने हा व्हिडीओ हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ बाईकस्वार तरुणाने ट्विटवरुन आणि युट्यूबवर अपलोड करुन मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तात्काळ या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. संबंधित या व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झाली. अखेर व्हिडीओत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाला मालाड वाहतूक पोलिस ठाण्यात बोलवून सिग्नल तोडणे आणि विना हेल्मेट गाडी चालवणे या गुन्ह्याखाली दंड भरायला सांगितले आणि त्याची पावती तक्रारदार बाईकस्वाराला पाठविण्यात आली.  

पाहा व्हिडीओ

टॅग्स :मुंबई पोलीसवाहतूक पोलीस