Join us  

ज्येष्ठ अभिनेते सुमंत मस्तकार यांचे निधन  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:09 AM

मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपट, अनेक जाहिराती, नाटक आणि मराठी, हिंदी मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते सुमंत मस्तकार (९५) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले.

मुंबई : मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपट, अनेक जाहिराती, नाटक आणि मराठी, हिंदी मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते सुमंत मस्तकार (९५) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.सुमंत मस्तकार यांनी मराठी व हिंदी नाटक, चित्रपट व मालिकांतून कामे केली. ‘माऊंटबॅटन द लास्ट व्हॉइसरॉय’ (लंडन), ‘बाय बाय ब्ल्यूज’ (कॅनडा), ‘बॉम्बे बॉइज’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आदी इंग्रजी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘अंकुश’ या हिंदी चित्रपटातील त्यांचा एक प्रसंग खूप गाजला होता. ‘पुढचं पाऊल’, ‘माळ्यावरचे फूल’, ‘शापित’, ‘अनपेक्षित’ अशा मराठी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘एक शून्य शून्य’, ‘शोध’, ‘बंदिनी’, ‘असे पाहुणे येती’ अशा गाजलेल्या मराठी मालिका त्यांच्या नावावर आहेत.‘रिश्ते-नाते’, ‘राज से स्वराज’, ‘स्वयंसिद्धा’, ‘अधिकार’, ‘वागले की दुनिया’ आदी हिंदी मालिका; तसेच ‘व्योमकेश बक्षी’, ‘हद कर दी’ अशा हिंदी नाटकांत त्यांनी अभिनय केला. ‘हेच आमचे तीर्थरूप’, ‘लागेबांधे’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, आदी मराठी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. शेकडो जाहिरातींमध्ये काम करून ते घराघरांत पोहोचले. प्रतिष्ठेचा ‘आयफा पुरस्कार’ त्यांना जाहिरातपटासाठी मिळाला होता.

टॅग्स :मृत्यूबातम्या