वेसावा मासेमारी बंदर कोलमडतय; शासनाने लक्ष देण्याची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 15, 2025 18:13 IST2025-04-15T18:13:12+5:302025-04-15T18:13:54+5:30

राज्यातील एकेकाळी सुप्रसिद्ध नैसर्गिक मासेमारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले वेसावा गाव सध्या मासेमारी मंदीच्या  दाट गडद परिस्थितीतून जात आहे.

vesave fishing port is collapsing government demands attention | वेसावा मासेमारी बंदर कोलमडतय; शासनाने लक्ष देण्याची मागणी

वेसावा मासेमारी बंदर कोलमडतय; शासनाने लक्ष देण्याची मागणी

मनोहर कुंभेजकर, मुंबई-राज्यातील एकेकाळी सुप्रसिद्ध नैसर्गिक मासेमारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले वेसावा गाव सध्या मासेमारी मंदीच्या दाट गडद परिस्थितीतून जात आहे. कोविड लॉकडाऊन च्या पूर्वी ज्या ठिकाणी साडेतीनशे हून अधिक यांत्रिकी ट्रॉलर नौका मासेमारी करत होत्या ती संख्या आज ६० च्या घरात येऊन ठेपलेली आहे. या गावातील वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने नॅशनल मरीन प्रॉडक्ट प्रॉडक्टिव्हिटी अवॉर्ड नऊ वेळा पटकावला आहे.

मात्र क्लायमेट चेंज चा परिणामा बरोबर येथील मासेमारी व्यवसायाला पायाभूत सुविधा पुरविण्यावर शासनाने केलेले दुर्लक्ष, आलेले सपशेल अपयश आहे. त्यामुळे मासेमारी नौकांच्या संख्येबरोबर मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबीयांचे उदरनिर्वाह ठप्प झाला आहे.राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि केंद्र सरकारने येथील मासेमारी व्यवसायाला गतवैभव प्राप्त करुन घ्यावे अशी मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली आहे.
 
पोर्तुगीजांच्या काळापासून मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेली वेसावे कोळी जमात मासे सुकविणे हेच एकमेव साधन म्हणून उपजीविकेचे होते मात्र इंग्रजाले आधुनिक यांत्रिकीकरणाने सुविधाही निर्माण झाल्या पण ब्रिटिशांनी मासेमारी साहित्यावर वाढविलेले दर, किंमती या विरोधात आणि देशा अभियानाच्या जागृतीतून तून स्वातंत्र्याची चळवळ  मोठ्या हिमतीने उभा करणाऱ्या गावाने मासेमारी व्यवसायात उपजत असलेल्या सहकार्य करण्याच्या गुणातून 

वेसावे गावात तीन मासेमारी सहकारी संस्था उदयास आल्या आणि एकट्या वेसावे गावाने ११४ स्वातंत्र्य सैनिक देशाला दिले. मासेमारी  सहकारी संस्था निर्माण झाल्या आणि मासेमारी व्यवसायाला बळकटीत प्राप्त झाली. मात्र मागील तीन दशकांपासून मासेमारी पारंपारिक व्यवसायाला उद्योगाची दिशा मिळाली नाही.दोन दशकांपूर्वी ४०० कोटींची वार्षिक उलाढाल आज जेमतेम ४० कोटीच्या उला ढालीवर येऊन ठेपइ आहे. त्यामुळे येथील  पारंपारिक मासेमारी नष्ट होत असल्याची खंत टपके यांनी व्यक्त केली.

बदलत्या वातावरणाचा परिणाम, विकासाच्या नावाने निरनिराळ्या प्रकल्पातून समुद्रावर होणारे अतिक्रमण, दिवसेंदिवस प्रदूषित होणाऱ्या नद्या खाड्या आणि किनारे, सागरी वनस्पती आणि पाणथळाच्या जागा बुजविण्याकडे असलेला कळ याबरोबरच एलईडी लाईट द्वारे पर्सेंट नेट मासेमारी करणाऱ्या भांडवलदारांच्या नौका यामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय संपुष्टात येत आहे. राज्याच्या किनाऱ्यावर झालेला हा परिणाम वेसावे बंदरावर देखील प्रकर्षाने जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली.

वेसावा खाडी आणि समुद्रात आणलेले निरनिराळे सिलिंग वांद्रे वर्सोवा सिलिंग, वर्सोवा मढ खाडीदरम्यान होणारे दोन पूल यातून मासेमारी बंदराला बगल देण्याचे सोपस्कार शासन करीत आहे. या विकास प्रकल्पाने बाधित होणारा वेसावा गाव मासेमारी मध्ये मागे पडला आहे. येथील मच्छीमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून नाही पुनर्वसन, नाही आर्थिक मदतीचा कोणताही मोबदला मिळत नसल्याची खंत मच्छिमार नेते प्रवीण भावे यांनी व्यक्त केली.

Web Title: vesave fishing port is collapsing government demands attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.