कोविड केंद्रांतील रुग्ण कमी झाल्याने व्हेंटिलेटर रुग्णालयात हलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:38+5:302021-02-05T04:25:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील कोरोना जम्बो केंद्रांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने तेथील सेवेत नसणारे व्हेंटिलेटर्स लवकरच महापालिका रुग्णालयांत ...

The ventilator will be moved to the hospital as the number of patients in the covid centers decreases | कोविड केंद्रांतील रुग्ण कमी झाल्याने व्हेंटिलेटर रुग्णालयात हलविणार

कोविड केंद्रांतील रुग्ण कमी झाल्याने व्हेंटिलेटर रुग्णालयात हलविणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील कोरोना जम्बो केंद्रांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने तेथील सेवेत नसणारे व्हेंटिलेटर्स लवकरच महापालिका रुग्णालयांत हलविण्यात येणार आहेत. पालिका रुग्णालयांत नाॅनकोरोना रुग्णसेवा पूर्ववत होतेय, परिणामी रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही व्हेंटिलेटर सेवा या रुग्णांकरिता वापरण्यात येणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

सध्या शहर उपनगरातील जम्बो कोरोना केंद्रांमध्ये सुमारे ६०० व्हेंटिलेटर्स आहेत. हे व्हेंटिलेटर्स गरजेप्रमाणे पालिका रुग्णालयांत उपलब्ध व्हावेत याकरिता रुग्णालय अधिष्ठात्यांना कोविड केंद्रांशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून, गरजेनुसार हे व्हेंटिलेटर त्या-त्या पालिका रुग्णालयात पाठविण्यात येतील.

याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, शहर उपनगरातील जम्बो कोविड केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. परिणामी, बऱ्याच प्रमाणात येथील व्हेंटिलेटर्सचा वापर न करता तसेच पडून आहेत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर्स पालिका रुग्णालयात पाठविण्यात येतील. हे करताना कोरोना केंद्रातील रुग्णांची संख्या, व्हेंटिलेटर सेवा, उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: The ventilator will be moved to the hospital as the number of patients in the covid centers decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.