आरोपींच्या नावे वाहने, जमिनी, रोकड
By Admin | Updated: August 26, 2015 01:01 IST2015-08-26T01:01:50+5:302015-08-26T01:01:50+5:30
बाळगंगा सिंचन गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीत आरोपींच्या नावे जामीन, गाड्या आणि बँक ठेवी असल्याचे उघड झाले आहे.

आरोपींच्या नावे वाहने, जमिनी, रोकड
ठाणे : बाळगंगा सिंचन गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीत आरोपींच्या नावे जामीन, गाड्या आणि बँक ठेवी असल्याचे उघड झाले आहे. अधिकाऱ्यांपैकी तिघे निवृत्त झाले असून, एकाला निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित असलेले राजेश रिठे यांच्याकडे रोख ४८ हजार ८० रुपये असून, त्यांचा फ्लॅट संजय दाते यांच्या नावे आहे. कुबेरा पार्क येथे ५६० चौ. फुटांचा फ्लॅट त्यांच्या वडिलांच्या नावे आहे तसेच ११७१ चौ. फुटाचा फ्लॅट त्यांच्या नावे असून इंदापूर येथील ०. ८० आऱ जमीन, तर ०.८१ हेक्टर जमीनही चंद्रकांत रिठे यांच्या नावे आहे. १.७७ हेक्टर जमीन अभिजित, तर१.८९ हेक्टर जमीन शैला यांच्या नावे आहे.
विजय कासट यांच्याकडे ४ लाख ४२ हजार २६५ हजारांची रोकड, १९ तोळे सोन्याचे दागिने, यामाहा मोटारसायकल, कल्याणमध्ये ५९५ चौरस फुटांचा फ्लॅट, तसेच बिनशेती प्लॉट आणि व्हेरिटो कार त्यांच्या नावावर आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे नाशिकमध्ये ३० लाख ८० हजारांची जमीन असून, स्वाती कासटे यांच्या नावे भिवंडीत ५ एकर २० गुंठे जमीन असल्याचे उघडकीस आले आहे.
कंत्राटदार निसार खत्री यांच्या खार येथे ४ इमारती असून, त्यांचे चटई क्षेत्रफळ साधारणत: २७,२०० स्के. फूट इतके आहे. तसेच त्यांच्या घरी १,२०० ग्रॅम वजनाचे सोने आणि ३ किलो चांदी आहे. तीन मर्सिडीझ बेन्झ, ३ स्कोडा,१ आॅडी, १ इन्होवा, २ ह्युंदाई कार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीत आरोपींच्या नावे जामिनी, गाड्या आणि बँक ठेवी असल्याचे उघड झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांपैकी तिघे निवृत्त झाले असून, एकाला निलंबित करण्यात आले आहे. गिरीश बाबर यांच्याकडे बँक खात्यात ३२ हजार ५०० रुपये, जमिनीचे ७/१२ उतारे सापडले असून ब्राम्हणी, राहुरी येथील १.५० आऱ जमीन अर्पणा बाबर आणि मोकम मोटम राहुरी येथील २.०० आऱ जमीन नितीन बाबर यांच्या नावे असल्याचे उघड झाले आहे. ते सेवानिवृत्त झाले आहेत.
सेवानिवृत बाबासाहेब पाटील यांचा कोल्हापूर येथे दोनमजली बंगला आहे. कुटुंबीयांच्या नावे विविध खात्यांत एकूण ६८ लाख ३८ हजारांची रक्कम आहे. पत्नीच्या नावे होन्डासिटी, तर सोलापूर येथील सांगोला येथे त्यांच्यासह त्यांच्या वडिलांच्या नावे २८०० चौ. फुटांचा पाटील निवास बंगला आहे. वडिलोपार्जीत साडेपाच एकर जमीन, पत्नीच्या नावे ५० गुंठे जमीन, वडिलोपार्जीत १४ एकर जमीन, उत्कर्ष व हर्ष पाटील यांच्या नावे ६७ गुंठे आणि साडेतेरा गुंठे जमीन, शुभलक्ष्मी व उत्कर्ष यांच्या नावे २९ गुंठे जमीन आहे.
रामचंद्र शिंदे यांच्या नावे पुण्यात ६० लाखांचा फ्लॅट, पुण्यातील रत्नदीप अपार्टमेंटमध्ये १५३० चौ. फुटांचे घर असून, ते त्याने २००३मध्ये २६ लाख ४५ हजारांना खरेदी केले आहे. तसेच सोलापुरात ५ एकर शेती असून, ती त्याने १९९८ मध्ये १ लाख २३ हजारांना खरेदी केली आहे. तर त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या नावे विविध बँकांत १८ लाख ८१ हजार रुपये, २ लाख ३७ हजार ५००चे ९.५० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, मंगळवेढा येथे घर आहे. सेवानिवृत्त आनंदा काळुखे यांचे कल्याणमध्ये तीन फ्लॅट आहेत. तसेच पत्नीच्या नावे कल्याणातच एक फ्लॅट, दोन दुकान गाळे आणि सांगलीत ७६७ चौफ़ुटाचे फ्लॅट खरेदी केले आहेत.