वाहन चोरी करणारी टोळी अटकेत

By Admin | Updated: October 23, 2014 00:04 IST2014-10-23T00:04:20+5:302014-10-23T00:04:20+5:30

गुन्हे शाखा पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. भंगारामध्ये निघालेली वाहने चोरून इतरत्र विक्रीचा प्रकार ही टोळी करायची.

Vehicle stolen gang | वाहन चोरी करणारी टोळी अटकेत

वाहन चोरी करणारी टोळी अटकेत

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. भंगारामध्ये निघालेली वाहने चोरून इतरत्र विक्रीचा प्रकार ही टोळी करायची. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ कार जप्त करण्यात आल्या आहेत.
कामोठे पोलिसांनी आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत तिघांना अटक केली होती. परंतु त्यांचा संबंध वाहन चोरी करणाऱ्या टोळीशी असल्याची माहिती यावेळी पुढे आली. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांनी तपास सुरू केला होता. त्यानुसार तपास पथकाने जयपूर, राजस्थान, अमृतसर, पंजाब व दिल्ली येथून चोरीची वाहने जप्त केली. तसेच टोळीच्या दोघांनाही अटक केली. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. तुषार अभिमन्यू जाधव (२४), अमनदीप उजागरसिंह (३६), राजेश भाऊसाहेब पाटील (३८), गुरुप्रीतसिंग दलबार सिंग (३०) आणि मनजितसिंग जोगेंदरसिंग मारवा (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व पुणे, अमृतसर, जळगाव, पंजाब येथील राहणारे आहेत. त्यामध्ये चार इनोव्हा, दोन बोलेरो, एक शेवरोलेट बीट व स्कोडा कारचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vehicle stolen gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.