ठाण्यात भाज्या कडाडल्या

By Admin | Updated: September 17, 2014 02:40 IST2014-09-17T02:40:50+5:302014-09-17T02:40:50+5:30

वातावरणातील बदलामुळे शेतातील भाज्यांवर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. शिवाय वाहतुकीदरम्यान भाज्या खराब होण्याचे प्रमाणही वाढले आह़े

Vegetables in Thane Shackle | ठाण्यात भाज्या कडाडल्या

ठाण्यात भाज्या कडाडल्या

ठाणो :  वातावरणातील बदलामुळे शेतातील भाज्यांवर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. शिवाय वाहतुकीदरम्यान भाज्या खराब होण्याचे प्रमाणही वाढले आह़े त्यातच पितृपक्षात मागणी वाढल्याने भाज्यांचे दर गेल्या आठवडयापासून चांगलेच कडाडले आहेत. अगदी किलोभर भाजीसाठी 1क्क् रुपयंची एक नोट संपत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे.
       शेतातून भाजी काढल्यानंतर ती ग्राहकांर्पयत पोहचायला साधारण 3 ते 4 दिवस जातात. शेतातून भाजी काढल्यावर शेतकरी ती घाऊक बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात. त्यानंतर ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये आणि नंतर मग स्थानिक बाजारात भाजी विक्रीसाठी येते. मात्र काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि मधूनच पडणारे उन यामुळे भाज्या सडू लागल्या आहेत. दुसरीकडे पावसामुळे शेतातच भाजीपाला खराब होत आहे. मोठया शहरांच्या बाजारपेठेत येणारा भाजीपाला हा बांधलेला असतो. नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 5क्क्-6क्क् गाडय़ा भाज्यांची आवक होते. परंतु, दमट वातावरणामुळे वाहतुकीदरम्यान या भाज्यासुद्धा खराब होत आहेत. अनेक विक्रेत्यांना त्यांच्याकडचा बराच भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. तसेच पितृपक्षात मागणी वाढल्याने भाज्यांचे भाव कडाडले आहेत.   
गणोशोत्सवादरम्यान भाज्यांचे भाव कमी झाले होते. मात्र आता भाज्यांचे भाव 25 ते 3क् टक्क्यांनी वाढले आहेत. (प्रतिनिधी)
 
असे आहेत भाव़़़
च्गवार, सिमला मिरची, मटार 1क्क् रुपये किलो तर गेल्या आठवडय़ात 5क्-6क् रुपये असलेली भेंडी आता 8क्-85 रुपये किलो झाली आहे. 35-4क् रुपये किलोने असलेली टोमॅटो,वांगी सध्या 5क् रुपये किलोवर पोहोचले आहेत. दुधी भोपळा, फरसबी सध्या 4क् रुपये किलो आहेत. मेथी, पालक,चवळीची मोठी जुडी 3क् रुपये तर कोथिंबिरीची जुडी 4-क् रुपयेभावाने विकली जात आहे.
 
मागणी केलेल्यापैकी काही भाजीपाला खराब निघत असून तो फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न आम्हा विक्रेत्यांसमोर असून दुसरीकडे दर वाढल्याने ग्राहकसुद्धा खरेदी करताना हात आखडता घेत आहेत.
- रामदास यादव, भाजी विक्रेते
1क्क् रुपयांत दोन भाज्याही किलोभर येत नाहीत. भाज्यांचे हे वाढलेले भाव खिशाला परवडत नाहीत.
- राखी देवळे, गृहिणी

 

Web Title: Vegetables in Thane Shackle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.