दरवाजांवर लागलेल्या स्टीकर्समुळे मतदार हैराण
By Admin | Updated: October 4, 2014 22:52 IST2014-10-04T22:52:33+5:302014-10-04T22:52:33+5:30
निवडणूक जवळ आल्याने प्रत्येक मतदारार्पयत पोहोचण्यासाठी आता उमेदवारांनी वेगवेगळे फंडे आजमावण्यास सुरुवात केली आहे.

दरवाजांवर लागलेल्या स्टीकर्समुळे मतदार हैराण
>ठाणो : निवडणूक जवळ आल्याने प्रत्येक मतदारार्पयत पोहोचण्यासाठी आता उमेदवारांनी वेगवेगळे फंडे आजमावण्यास सुरुवात केली आहे. परंतु, याचा नाहक त्रस आणि भरुदड मतदारराजाला सहन करावा लागत आहे. कारण, त्यांची परवानगी न घेता उमेदवाराचे छायाचित्र आणि पक्षाचे चिन्ह असलेले स्टीकर प्रत्येक मतदाराच्या घरावर चिकटवले जात आहे. त्यामुळे मतदारराजा वैतागला आहे.
येत्या काही दिवसांवर आता दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरांना रंगरंगोटी करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी कर्ज काढून अथवा इकडून तिकडून पैसा जमा करून ठाणोकरांनी आपल्या घरांची जशी जमेल तशी सजावट केली आहे. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी त्यांची घोर निराशा केली आहे. चौकसभा, रॅली, मेळाव्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदारार्पयत पोहोचता येतेच, असे नाही. त्यामुळे पत्रके, स्टीकर आदींचा सहारा उमेदवारांनी घेतला आहे.
काहींनी दस:याच्या आधीच घरांची रंगरंगोटी केली आहे. घराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा दरवाजादेखील सजविण्यात आला आहे. परंतु, आता रात्री झोपेत असताना त्यांच्या याच दरवाजांवर उमेदवारांचे स्टीकर्स लावली जात आहेत. सकाळ झाल्यानंतर ते त्यांच्या नजरेस पडत आहे. ते स्टीकर काढण्यास गेले असता दरवाजाचा रंगही निघत आहे. त्यामुळे याचा खर्च कोण देणार, असा सवाल मतदारराजा करू लागला आहे. किमान आम्हाला विचारून तरी ते लावा. ते कुठे लावायचे, ते आम्ही सांगू, असा सल्लाही आता मतदारांनी कार्यकत्र्याना दिला आहे. (प्रतिनिधी)