सांगलीत मंगळवारपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव

By Admin | Updated: September 20, 2014 00:23 IST2014-09-19T23:47:23+5:302014-09-20T00:23:05+5:30

अशोक सावंत : सलग सहावे वर्ष

Vasundhara Film Festival from Sangli on Tuesday | सांगलीत मंगळवारपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव

सांगलीत मंगळवारपासून वसुंधरा चित्रपट महोत्सव

सांगली : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सांगली येथे मंगळवार दि. २३ ते २५ सप्टेंबर या कालावधित आयोजित करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे निमंत्रक अशोक सावंत यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.
अशोक सावंत म्हणाले की, सांगली फिल्म सोसायटी आणि रोटरी क्लब आॅफ सांगली यांच्या सहयोगाने सांगलीत सलग सहाव्यावर्षी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यावरण, वन्य जीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी या पाच विषयांवरील दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वीस चित्रपटांचा समावेश आहे.
शहरातील २४ शाळांमधून सकाळी विद्यार्थ्यांसाठी ‘हसत खेळत पर्यावरण’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच ‘ग्रीन टेक्नॉलॉजी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात येणार आहे.
गणेशनगर येथील रोटरी हॉलमध्ये रोज सायंकाळी साडेपाच ते साडेनऊ या कालावधित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. वसुंधरा सन्मान पुरस्कार वीज बचतीसाठी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या प्रियदर्शिनी कर्वे यांना देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस अरुण दांडेकर, महेश कराडकर, पापा पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Vasundhara Film Festival from Sangli on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.