वासुदेव आला हो! वासुदेव आला...! नाद पुन्हा घुमू लागला
By Admin | Updated: February 17, 2015 22:46 IST2015-02-17T22:46:55+5:302015-02-17T22:46:55+5:30
कळंबोली : हरिनाम बोला... हरिनाम बोला... वासुदेव आला... अन् वासुदेव आला... रामाच्या पहरी वासुदेव आला...

वासुदेव आला हो! वासुदेव आला...! नाद पुन्हा घुमू लागला
कळंबोली : हरिनाम बोला... हरिनाम बोला... वासुदेव आला... अन् वासुदेव आला... रामाच्या पहरी वासुदेव आला... दान पावले....! सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांसोबत वासुदेवाची पावले आपल्या घराकडे वळतात. वासुदेवाच्या सुमधुर अभंगवाणीने अख्खा परिसर आनंदमय होऊन जातो. दान मागण्यासाठी दारी आलेला वासुदेव शहरात दुर्मिळ होत गेला.
आळंदी (पुणे) येथील गणेश वासुदेव कळंबोली परिसरात रामप्रहरी अवतरले आणि सर्व परिसरच त्यांच्या अभंगातील गोडव्याने आनंदमय झाले होते. रामप्रहरी घरांच्या अंगणाशिवाय गॅलरीच भरगच्च भरल्याचे अनुभवास आले. सुपातून धान्यदान मिळण्याची जागा आता पैशांनी घेतली. पैशांनी वासुदेवाचा खिसा तर भक्कम झाला पण धान्यासाठीची झोळी मात्र रिकामी ती रिकामीच राहिली. धान्याचे दान हे श्रेष्ठदान समजले जाते, पण शहरातील माणसे पैशातच दान मोजण्यात धन्यता मानतात आणि त्याची परतफेड वासुदेव हा लोकांना जनजागृती, आरोग्य, नीतिमूल्य, कुटुंबकल्याण अशा प्रकारचे सामाजिक उपदेशात्मक संदेश देत असत. सडासारवण, अंगण झाडलोड करणाऱ्या घरांनाच रामप्रहरी वासुदेव शोभून दिसतो. दान मागण्यासाठी आलेल्या वासुदेवाला पसाभर धान्य मिळायचे. त्या धान्यानेच आपला उदरनिर्वाह भागवायचे असे जीवन वासुदेवाचे.
कलियुगी लोकांतील जीवनमान वैज्ञानिक प्रगतीसोबत दळणवळण आणि लोकसंपर्काची साधने वाढल्याने आधुनिक होत गेली. (वार्ताहर)
धान्याऐवजी पैशाचे दान
४आळंदी (पुणे) येथील गणेश वासुदेव कळंबोली परिसरात रामप्रहरी अवतरले आणि सर्व परिसरच त्यांच्या अभंगातील गोडव्याने आनंदमय झाले होते. रामप्रहरी घरांच्या अंगणाशिवाय गॅलरीच भरगच्च भरल्याचे अनुभवास आले. सुपातून धान्यदान मिळण्याची जागा आता पैशांनी घेतली. पैशांनी वासुदेवाचा खिसा तर भक्कम झाला पण धान्यासाठीची झोळी मात्र रिकामी ती रिकामीच राहिली. धान्याचे दान हे श्रेष्ठदान समजले जाते, पण शहरातील माणसे पैशातच दान मोजण्यात धन्यता मानतात.