वाशीत गिरीराज सिंग यांचा काँग्रेसकडून निषेध

By Admin | Updated: April 3, 2015 03:06 IST2015-04-03T03:06:49+5:302015-04-03T03:06:49+5:30

खासदार गिरीराज सिंग यांनी काँगे्रस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा काँगे्रसच्या महिला आघाडीने निषेध केला

Vashit Giriraj Singh protested by Congress | वाशीत गिरीराज सिंग यांचा काँग्रेसकडून निषेध

वाशीत गिरीराज सिंग यांचा काँग्रेसकडून निषेध

नवी मुंबई : खासदार गिरीराज सिंग यांनी काँगे्रस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा काँगे्रसच्या महिला आघाडीने निषेध केला. वाशीमध्ये गुरूवारी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी गिरीराज सिंग यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला.
वाशीतील काँगे्रस भवनच्या परिसरात महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करून गिरीराज सिंग यांचा पुतळा जाळला. ‘सिंग यांनी केलेले वक्तव्य निषेधार्हच आहे. त्यांनी फक्त सोनिया गांधींचाच नाही तर सर्वच महिलांचा अपमान केला आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,’ अशी मागणी महिला काँगे्रसच्या अध्यक्ष नीला लिमये यांनी यावेळी केली. यावेळी प्रदेश महिला काँगे्रसच्या चंद्रकला नायडू, उज्ज्वला साळवे, मीना शेळके, आशा कश्यप व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)

Web Title: Vashit Giriraj Singh protested by Congress