वाशीत राष्ट्रवादी काँगे्रसला झटका
By Admin | Updated: March 19, 2015 00:09 IST2015-03-19T00:09:31+5:302015-03-19T00:09:31+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमधील गळती सुरूच आहे. वाशीमधील ज्येष्ठ नगरसेवक संपत शेवाळे यांनीही बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

वाशीत राष्ट्रवादी काँगे्रसला झटका
नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमधील गळती सुरूच आहे. वाशीमधील ज्येष्ठ नगरसेवक संपत शेवाळे यांनीही बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. नेतृत्वाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डावलण्यात येत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाच्या ८ नगरसेवकांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. पक्षाचे वाशी प्रभाग-५६चे (नवीन प्रभाग ६३) नगरसेवक संपत शेवाळे यांनीही बुधवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. यामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. प्रभागामध्ये सर्वाधिक विकासकामे करणाऱ्या नगरसेवकांमध्ये शेवाळे यांचा समावेश होता. वाशी सेक्टर-१७ मध्ये मागील पाच वर्षांत सर्व पदपथांचे नूतनीकरण, रस्ते, पथदिवे, मोठ्या नाल्याचे काँक्रिटीकरण, उद्यानाचे सुशोभीकरण करून त्यांनी प्रभागाचा कायापालट केला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये हमखास निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये त्यांचे नाव गणले जात होते. परंतु प्रभाग रचनेमध्ये त्यांच्या प्रभागास शेजारच्या माजी उपमहापौर भरत नखाते यांच्या प्रभागातील काही भाग जोडला गेला.
वाशीतील नवीन प्रभाग - ६३ मधील उमेदवारी मिळविण्यावरून भरत नखाते व संपत शेवाळे यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. दोघांनी स्वत:च्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. मूळ प्रभागाचा ८० टक्के भाग असल्यामुळे शेवाळे यांनी तिकिटावर दावा केला होता. तर निष्ठावान असल्याचे कारण देत नखाते यांनी प्रचार सुरू केला होता. नेतृत्वाही नखाते यांच्या बाजूने झुकत होते. यामुळे शेवाळे यांनी राजीनामा
दिला. ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीबाहेर
पडलेले नगरसेवक
च्संपत शेवाळे, एम. के. मढवी, विनया मढवी, शिवराम पाटील, अनिता पाटील, किशोर पाटकर, नारायण पाटील, कविता जाधव