वाशीत आज वीज नाही
By Admin | Updated: July 17, 2015 02:50 IST2015-07-17T02:50:20+5:302015-07-17T02:50:20+5:30
महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी (१७ जुलै) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

वाशीत आज वीज नाही
नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी (१७ जुलै) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
सावळा कोल्ड स्टोरेज, या वीज वाहिनीवरील सानपाडा एरिया, अलाना ग्रुप आणि कुकशेत एरिया या परिसरातील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहील. अमिनस या वीज वाहिनीवरील इंदिरानगर, अमूल डेअरी, एमआयडीसी एरिया, डी ब्लॉक, इगलू डेअरी या परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९ ते ९.३० आणि संध्याकाळी ५ ते ५.३० या वेळेत बंद राहणार आहे. घणसोली या वीज वाहिनीवरील घणसोली गाव, तळवली गाव, साई निधी हॉटेल, पेट्रोल पंप या परिसरांतील वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद राहील. रबाळे एमआयडीसी या वीज वाहिनीवरील प्लॉट नं. बी - २१ ते बी -२५, भारत बिजली, अश्विन क्वारी, साईनगर या परिसरांतील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत बंद राहील. फिलिप्स या वाहिनीवरील एचटी ग्राहक - भारत बिजली, हिंदुस्थान लिव्हर, दिवा नाका, शिवाजी फ्लोर आणि मेरिडीयन फ्लोर, एमटीएनएल, वृषाली हॉटेल, सिग्मा आयटी पार्क, इंडिको आणि साईप्रसाद हॉटेल ग्रुप, पोलीस स्टेशन एरिया, भीमनगर, कातरीपाडा, दिवा नाका, एमआयडीसी रबाळे परिसरांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी १२पर्यंत बंद राहील. नेवा गार्डन या वीज वाहिनीवरील सेक्टर १९ आणि २० ऐरोली, एनएमएमसी वॉटर टँक आणि एनएचपी शाळा ऐरोली या परिसरांतील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. नोसील लिंक लाईन या वीज वाहिनीवरील वृषाली हॉटेल ते दशमेरा आणि दशमेरा ते अल्ट्राटेक सिमेंट, एमआयडीसी रबाळे या परिसरांतील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत बंद राहील. (प्रतिनिधी)