वसईत डेंग्यूचे 26, मलेरियाचे 10 रुग्ण
By Admin | Updated: November 13, 2014 23:10 IST2014-11-13T23:10:07+5:302014-11-13T23:10:07+5:30
मुंबई-ठाण्यातील डेंग्यूचे लोण आता वसई तालुक्यातही पोहोचले आहे. वसई पूर्व-पश्चिम भागात डेंग्यूचे 26 तर मलेरियाचे 1क् रुग्ण आढळले आहेत.

वसईत डेंग्यूचे 26, मलेरियाचे 10 रुग्ण
वसई : मुंबई-ठाण्यातील डेंग्यूचे लोण आता वसई तालुक्यातही पोहोचले आहे. वसई पूर्व-पश्चिम भागात डेंग्यूचे 26 तर मलेरियाचे 1क् रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात याच भागात एका अकरावर्षीय मुलाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला. येथे विविध रुग्णांत वाढ झाल्याने स्थानिक नगरसेवकाने पालिका माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
राज्यात सर्वत्र डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे. वसईतही महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 6क् मधील भोईदापाडा येथे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्यात येथील रुग्णांची संख्या 37 होती. ती या महिन्यात 26 वर आली आहे. मलेरियाच्या रुग्णांची संख्या 3क् वरून 1क् वर आली आहे. यात भोईदापाडा येथे राहणा:या सुंदर अजरुन टिश्कू (11) याचा दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू ओढवला, तर अन्य 1क् जण आजारी आहेत.
या दुर्घटनेनंतर येथील कूपनलिकेतील व तलावातील पाण्याची तपासणी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगरपालिकेतील गटनेते वसंत वैती यांनी केली आहे. रुग्णांची आकडेवारी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणो यांनी नगरसेवक वसंत वैती यांना आज दिली. उद्या वैती यांनी या भागात आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो या संसर्गजन्य रोगांचे निदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)