वसईत एका रात्रीत १२ सदनिका फोडल्या
By Admin | Updated: September 22, 2014 00:54 IST2014-09-22T00:54:02+5:302014-09-22T00:54:02+5:30
वसईरोड पूर्वेस महावितरण कंपनीच्या वसाहतीमध्ये काल एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी ११ घरफोड्या केल्या. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही

वसईत एका रात्रीत १२ सदनिका फोडल्या
वसई : वसईरोड पूर्वेस महावितरण कंपनीच्या वसाहतीमध्ये काल एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी ११ घरफोड्या केल्या. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. एका घरातून चांदीच्या वस्तू व १ हजार रू. रोख रक्कम लांबवण्यात चोरटे यशस्वी ठरले. दुसऱ्या एका घटनेत अगरवाल नगरी येथे दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत लाखो रू. किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले.
वसईरोड रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या महावितरण कंपनीच्या वसाहतीमध्ये शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ सदनिका फोडल्याचे दिसून आले. त्यापैकी ७ ते ८ सदनिका रिकाम्या होत्या तर एका सदनिकेमधून त्यांनी चांदीचे दागिने पळवून नेले.
दुसऱ्या घटनेत अगरवाल नगरी येथील एका इमारतीमधील सदनिकेत शिरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचे दागिने पळवून नेले. या दोन्ही प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)