वसई-विरारचे पाणी तोडले

By Admin | Updated: February 6, 2015 23:14 IST2015-02-06T23:14:06+5:302015-02-06T23:14:06+5:30

परतीच्या पावसाने दडी मारल्याने यंदा तळी, विहिरी, नद्यातील पाणी हिवाळ्याच्या शेवटीच संपत आले आहे

Vasai-Virar water broke | वसई-विरारचे पाणी तोडले

वसई-विरारचे पाणी तोडले

पारोळ : परतीच्या पावसाने दडी मारल्याने यंदा तळी, विहिरी, नद्यातील पाणी हिवाळ्याच्या शेवटीच संपत आले आहे. परिणामी, येथे आतापासूनच पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने उसगाव धरणातून वसई विरार महानगरपालिकेला पाणी देण्यास तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला असून पाणीपुरवठाच खंडीत केला आहे. यामुळे सायवन, घाटेघर, शिरवली, पारोळ, उसगाव,
चांदीप, शिवणसइ, मांडवी या गावाना पाण्याची टंचाई निर्माण झाली
आहे.
वसई पूर्व भागातून उसगाव धरण व शिरवली येथील तानसा नदीचे पात्र या मधून वसई विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. पारोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून अनेक गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात येते.
पण या वर्षी तानसा नदीवरील उसगांव, (वसई) व खराडतारा येथील बंधारे उशीरा बांधल्याने तानसा नदीच्या पात्रात समुद्राच्या भरतीने पाणी घुसले. परिणामी, तानसा नदीच्या पात्रात खारे पाणी आले. त्यामुळे शिरवली येथून होणारा पाणीपुरवठा अगोदरच बंद केला गेला. आता केवळ उसगाव धरणातून पाणीपुरवठा होऊ लागल्याने त्याची पातळी कमी झाली.
शिवाय, यंदा याच धरणातून उन्हाळी भात शेतीला पाणी सोडल्याने पाण्याची पातळी आणखीनच घटल्याने पुढे शेतीला पाणी पुरेल की नाही, या भयापोटी शेतकऱ्यांनी वसई विरार महानगरपालिकेचा पाणीपुरवठा खंडीत केला. या पाणी प्रश्नाबाबत महानगरपालिकेचे अधिकारी तसेच शेतकरी यांमध्ये चर्चा सुरू असून यावर योग्य तो तोडगा निघेल असे सूत्राकडून समजले. (वार्ताहर)

वज्रेश्वरी : उसगाव येथे असलेल्या तलावातून वसई-विरार महानगरपालिका आणि गुरुदेव सिद्धपीठ यांना होणारा पाणीपुरवठा येथील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून बंद केला आहे. येथील शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे ८० हेक्टर जमिनीवर भातशेतीची लागवड केली आहे. दरवर्षी मार्च महिन्यानंतर या तलावातून वसई-विरारला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून पालिकेने जादा पाणीउपसा केला यामुळे धरणातील पाणीसाठा पाहता हे पाणी भातशेतीसाठी शेवटपर्यंत राहू शकत नाही. हे ओळखून संतप्त १५० शेतकऱ्यांनी पंपहाऊसला कुलूप ठोकून वसई-विरार महापालिका व गुरुदेव सिद्धपीठ यांचा पाणीपुरवठा बंद केला.

Web Title: Vasai-Virar water broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.