वसई-विरार मनपा निवडणूक एप्रिलला
By Admin | Updated: February 5, 2015 23:07 IST2015-02-05T23:07:14+5:302015-02-05T23:07:14+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात घोषित होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी ८९ जागांसाठी निवडणूक झाली होती.

वसई-विरार मनपा निवडणूक एप्रिलला
दीपक मोहिते - वसई
वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात घोषित होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी ८९ जागांसाठी निवडणूक झाली होती. यंदा त्यामध्ये २६ जागा वाढतील, असा अंदाज आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर १ जून २०१० ला पहिल्या महापौरांनी सूत्रे हाती घेतली.
ग्रामपंचायतींच्या निवडणूका होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात या निवडणुका होतील, अशा अंदाजाने काही राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सेना-भाजपा युती, लोकहितवादी पार्टी, हे राजकीय पक्ष रिंगणात होते. त्यापैकी बहुजन विकास आघाडी व लोकहितवादी पार्टी या दोन पक्षांना मतदारांची पसंती मिळाली. मतदारांनी इतर पक्षांच्या पदरात प्रत्येकी २ जागांचे दान टाकले.
गेल्या साडेचार वर्षांत महानगरपालिका सभागृहात झालेल्या अनेक महासभांमध्ये संघर्ष पाहावयास मिळाला. गेल्या साडेचार वर्षांत आरोग्य, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम इ. विभागांच्या विकासकामांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. अवघ्या ५ वर्षांत महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली. तर केंद्र सरकारच्या सॅटेलाइट सिटी योजनेंतर्गत महानगरपालिकेला चांगला आर्थिक निधी उपलब्ध झाला.
या आर्थिक निधीतून सध्या भूमिगत गटारे व अन्य विकासकामे करण्यात येत आहेत. तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करण्यात आल्यामुळे सर्वत्र रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकले.
४गेल्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सेना-भाजपा युती, लोकहितवादी पार्टी, हे राजकीय पक्ष रिंगणात होते. त्यापैकी बविआ व लोकहितवादी पार्टीला पसंती मिळाली. इतर पक्षांच्या पदरात मतदारांनी प्रत्येकी २ जागांचे दान टाकले.
४तर गेल्या चार वर्षात सभागृहात झालेल्या अनेक महासभांमध्ये संघर्ष पाहावयास मिळाला.