वसई तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: November 5, 2014 22:52 IST2014-11-05T22:52:05+5:302014-11-05T22:52:05+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी त्वरित पकडण्यात यावेत, याकरिता दलित समाजाने बुधवारी वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेला.

वसई तहसीलवर मोर्चा
वसई : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी त्वरित पकडण्यात यावेत, याकरिता दलित समाजाने बुधवारी वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेला. या वेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वसई-विरार उपप्रदेशातील दलित समाजाने जवखेडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना त्वरित पकडण्यात यावे तसेच अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. यामध्ये दलित समाजातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा तहसीलदार कचेरीवर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. याप्रश्नी योग्य ती कार्यवाही न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे आंदोलकांतर्फे स्पष्ट करण्यात आले. हे आंदोलन उपमहापौर रूपेश जाधव, रिपाइं अध्यक्ष ईश्वर धुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. (प्रतिनिधी)