वसई पोलीस ठाण्याची डागडुजी सुरू

By Admin | Updated: May 21, 2014 05:05 IST2014-05-21T05:05:34+5:302014-05-21T05:05:34+5:30

वसई पोलीस ठाण्याच्या दुरवस्थेबाबत लोकमतने दिलेल्या वृत्ताची दखल घेत अखेर या पोलीस ठाण्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले.

Vasai police station's repair started | वसई पोलीस ठाण्याची डागडुजी सुरू

वसई पोलीस ठाण्याची डागडुजी सुरू

नायगाव : वसई पोलीस ठाण्याच्या दुरवस्थेबाबत लोकमतने दिलेल्या वृत्ताची दखल घेत अखेर या पोलीस ठाण्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले. याबाबत ९ मे रोजी वसई पोलीस ठाण्याची दुरवस्था या मथळ्याखाली छायाचित्रासह वस्तुस्थिती मांडली होती. भिंतींना तडा तर प्लॅस्टरही निखळण्याच्या स्थितीत, सिलिंगचे काही भाग कोसळून अनेकदा कर्मचारी बचावले होते. अशा अवस्थेत सा. बां. विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिले असता या पोलीस ठाण्याची डागडुजी सुरू झाली. प्राथमिक दुरूस्तीत सिलिंग व इतर डागडुजी सुरू करण्यात आली. मात्र आवश्यक ठिकाणी त्वरित दुरस्त्या करणे महत्वाचे झाले आहे. याकरिता ५२,७५० रू. चे खर्चाचे दरपत्रकही सादर करण्यात आले होते. याबाबत कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक नूतनीकरण गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Vasai police station's repair started