वसई महापौरपदासाठी २ तर उपमहापौरपदासाठी ६ अर्ज दाखल
By Admin | Updated: June 26, 2015 23:03 IST2015-06-26T23:03:38+5:302015-06-26T23:03:38+5:30
आज महापौर व उपमहापौरपदासाठी अनुक्रमे २ व ६ अर्ज दाखल झाले. यावेळी बहुजन विकास आघाडीने प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. विवा महाविद्यालय ते

वसई महापौरपदासाठी २ तर उपमहापौरपदासाठी ६ अर्ज दाखल
वसई : आज महापौर व उपमहापौरपदासाठी अनुक्रमे २ व ६ अर्ज दाखल झाले. यावेळी बहुजन विकास आघाडीने प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. विवा महाविद्यालय ते महानगरपालिका मुख्यालयादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सुमारे ३ ते ४ हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही निवडणूक सोमवार २९ जून रोजी होणार आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने १०६ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यामुळे महापौर व उपमहापौरपद त्यांच्याकडे जाणार आहे.
आज सकाळी ११ वा. बहुजन विकास आघाडीच्या प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर व नगरसेवक पंकज ठाकूर इ. मान्यवर उपस्थित होते. तर सेनेतर्फे किरण चेंदवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे भरत मकवाना, नितीन राऊत, प्रविण शेट्टी, प्रशांत राऊत, उमेश नाईक तर सेनेतर्फे स्वप्नील बांदेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. सभागृहामध्ये बहुजन विकास आघाडी १०६, शिवसेना - ५, अपक्ष - ३ व भाजप - १ असे बलाबल आहे. एकंदरीत हे लक्षात घेता ही दोन्ही पदे बहुजन विकास आघाडीकडे जातील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणारी आहे. (प्रतिनिधी)