वसई निवडणूक : निलंबित, निवृत्त, ‘मयतां’सह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण?

By Admin | Updated: June 3, 2015 04:28 IST2015-06-03T04:28:48+5:302015-06-03T04:28:48+5:30

पालिकेच्या प्रभाग क्र. ३८ अ या जागेच्या पोटनिवडणुकीसह वसई-विरार पालिका निवडणुकीसाठी मीरा-भार्इंदर पालिकेतील १ हजार १६० कर्मचारी ३ जून

Vasai Election: Employees' training with suspended, retired, 'mum' | वसई निवडणूक : निलंबित, निवृत्त, ‘मयतां’सह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण?

वसई निवडणूक : निलंबित, निवृत्त, ‘मयतां’सह कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण?

भार्इंदर : पालिकेच्या प्रभाग क्र. ३८ अ या जागेच्या पोटनिवडणुकीसह वसई-विरार पालिका निवडणुकीसाठी मीरा-भार्इंदर पालिकेतील १ हजार १६० कर्मचारी ३ जून रोजी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये प्रशासनाच्या गलथान पणामुळे निलंबित, निवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण १ हजार ५५६ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३९६ कर्मचारीच उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पालिका पुरती ठप्प होण्याची शक्यता आहे.
गतवेळच्या निवडणुकीसाठी पालिकेतील अपंगांसह शिक्षक व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जुंपल्याचे सर्वश्रुत असतानाच यंदा वसई-विरार पालिकेने मीरा-भार्इंदर पालिकेकडे १ हजार १०० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. वसई-विरार पालिकेने जिल्हा प्रशासनाकडून पूर्वीच्या कर्मचाऱ्यांचीच यादी प्राप्त केल्याने नेहमीप्रमाणे निलंबित, मयत, निवृत्त व अपंग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचा कार्यादेश पारित केला आहे.
अद्याप ५५१ कर्मचाऱ्यांना रवाना करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी त्यातील २१५ कर्मचाऱ्यांचा कार्यादेश रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यात निलंबित ३, मयत व निवृत्त प्रत्येकी ९, अपंग २० कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील पाणीपुरवठा विभागातील ८९ कर्मचारी, अग्निशमन दलातील २७ सब स्टेशन आॅफीसर, २ ध्वज नियंत्रण कर्मचारी व स्वच्छता व वैद्यकीय विभागातील ५६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ४०० कर्मचारी रवाना झाले असून मागणीपैकी उर्वरीत ६०९ कर्मचाय््राांसाठी ३ जून रोजी निवडणूक प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्यामुळे ते प्रशिक्षणासाठी वसई-विरार येथे रवाना होणार असल्याने पालिकेत मोजकेच कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

Web Title: Vasai Election: Employees' training with suspended, retired, 'mum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.