Join us

बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची ‘आरास’; मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 02:06 IST

गजर, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार केलेल्या महिला, मुली, पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्ने, खीर, मोदकाचा प्रसाद अशा थाटात आगमन झालेले गणराय यंदा थेट वरुणराजालाच घेऊन आले.

मुंबई : गजर, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार केलेल्या महिला, मुली, पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्ने, खीर, मोदकाचा प्रसाद अशा थाटात आगमन झालेले गणराय यंदा थेट वरुणराजालाच घेऊन आले. बाप्पा घरी येत असतानाच राज्याच्या अनेक भागांमध्ये सरी कोसळू लागल्याने उत्सवाच्या आनंदात भर पडली.मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. खान्देश, विदर्भ व मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका भर पावसात सुरू होत्या. असाच पाऊस काही दिवस राहो आणि महाराष्ट्रावरील संकट दूर होवो, अशीच कामना भक्तांनी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी केली.शहरांमधून निघालेल्या शाही मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न नको, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :गणेशोत्सव