वर्सोवा बीच क्लीनिंगचा आज शतकी सप्ताह, श्रमदानातून सुरू झालेला उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 07:11 AM2017-09-16T07:11:04+5:302017-09-16T16:22:03+5:30

श्रमदानातून वर्सोवा बीच चकाचक होऊ शकतो हे वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्स (व्हीआरव्ही)चे जनक अ‍ॅड. आफरोज शाह आणि त्यांच्या सहका-यांनी दाखवून दिले आहे. आॅक्टोबर २०१५ पासून ‘व्हीआरव्ही’ने दर शनिवारी आणि रविवारी सुरू केलेल्या या मोहिमेतून ७ लाख २० हजार किलो कचरा येथून जमा करण्यात आला.

 Varsova Beach Cleaning undertaken today, commenced with labor and labor | वर्सोवा बीच क्लीनिंगचा आज शतकी सप्ताह, श्रमदानातून सुरू झालेला उपक्रम

वर्सोवा बीच क्लीनिंगचा आज शतकी सप्ताह, श्रमदानातून सुरू झालेला उपक्रम

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई : श्रमदानातून वर्सोवा बीच चकाचक होऊ शकतो हे वर्सोवा रेसिडेन्ट व्हॉलेंटियर्स (व्हीआरव्ही)चे जनक अ‍ॅड. आफरोज शाह आणि त्यांच्या सहका-यांनी दाखवून दिले आहे. आॅक्टोबर २०१५ पासून ‘व्हीआरव्ही’ने दर शनिवारी आणि रविवारी सुरू केलेल्या या मोहिमेतून ७ लाख २० हजार किलो कचरा येथून जमा करण्यात आला. देशातील या अभूतपूर्व स्वच्छता मोहिमेला १६ सप्टेंबर रोजी १०० आठवडे पूर्ण होत आहेत. यानिमित्त दुपारी ३ ते ५ दरम्यान वर्सोवा येथील देवाची वाडीसमोरील बीचवर सुमारे २००० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत ‘बीच क्लीनिंग’चा शतकी आठवडा सोहळा साजरा होणार असल्याचे अ‍ॅड. आफरोज शाह यांच्याबरोबर सुरुवातीपासून सहभागी असलेल्या वर्सोवा कोळीवाड्यातील राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी सांगितले.
या मोहिमेत अभिनेत्री पूजा भट, रणदीप हुडा, युनायटेड नेशन, राज्य शासनाचे प्रतिनिधी, पालिकेचे अधिकारी, वेसावे कोळीवाड्यातील कोळी बांधव, पश्चिम उपनगरातील अनेक शाळांचे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या एमबीएचे विद्यार्थी आणि अनेक सामाजिक संस्था आणि अशासकीय संस्था सहभागी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. आफरोज शाह यांनी दिली.
या मोहिमेला वेसावकरांनी सुरुवातीपासून सहकार्य केले आहे. तर पालिकेचे आयुक्त अजय मेहता तसेच पालिका उपायुक्त किरण आचरेकर, साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनीसुद्धा या मोहिमेत लक्ष घालून पालिकेची यंत्रसामग्री आणि जमा झालेला कचरा उचलण्यासाठी डंपर, ट्रक आणि सफाई कामगार उपलब्ध करून दिल्याची माहिती या मोहिमेत सहभागी असलेला एमबीएमचा विद्यार्थी मोहित रामले आणि डॉ. चारूल भानजी यांनी दिली.
अ‍ॅड. आफरोज शाह यांनी खिडकीतून दिसणाºया आणि बकाल झालेल्या वर्सोवा बीचचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांच्या आणि कै. हरीबंश माथूर यांनी गेल्या १ वर्षापूर्वी २ आॅक्टोबर २०१५ रोजी सुरू केलेल्या वर्सोवा बीचच्या स्वच्छता मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली आहे. या मोहिमेत ६ वर्षांच्या चिमुरड्यांसह ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकही सहभागी होत आहेत. भविष्यात समाजातील सर्व स्तरातील लोक या किनाºयावर येऊन शुभ्र वाळूत सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद लुटतील, असा विश्वास येथील नागरिक आणि शिक्षणमहर्षी अजय कौल यांनी व्यक्त केला.
पालिका आयुक्त अजय मेहता, वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर, पालिका उपायुक्त किरण आचरेकर आणि के(पश्चिम) विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड, स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनीदेखील या स्वच्छता मोहिमेला वेळोवेळी सहकार्य केले आहे. पालिकेतर्फे २ जेसीबी, २ ट्रॅक्टर, २ वजनकाटे, ५ डम्पर्स आणि पालिकेचे ३० कर्मचारी आदी साधन सामग्री त्यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती वेसावे कोळी जमात रिलीजस आणि चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश भिकरू आणि माजी अध्यक्ष मनिष भुनगवले यांनी दिली.

गेल्या वर्षी गांधी जयंती दिनी युनायटेड नेशनच्या पर्यावरणप्रमुखांनी येथे भेट देऊन या मोहिमेचे कौतुक केले होते. त्या वेळी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे या मोहिमेकडे लक्ष कधी जाणार, असा सवाल ‘लोकमत’ने आपल्या वृत्तात केला होता. अखेर त्यांनी आॅगस्ट महिन्याच्या तिसºया आठवड्यात वेसावे समुद्रकिनारी भेट देऊन या मोहिमेचे कौतुक केले. इतकेच नव्हे तर त्यांनी येथील कचरा उचण्यासाठी एक ट्रॅक्टर आणि एलिव्हेटर उपलब्ध करून दिल्याची माहिती अ‍ॅड. शाह यांनी दिली.
 

Web Title:  Varsova Beach Cleaning undertaken today, commenced with labor and labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई