वर्षा गायकवाड यांनाही अश्लील संदेश

By Admin | Updated: March 8, 2017 04:52 IST2017-03-08T04:52:53+5:302017-03-08T04:52:53+5:30

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, भाजपा आमदार विद्या चव्हाण, भाजपा नेत्या शायना एन. सी. यांच्यानंतर आता काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनाही अश्लील संदेश आल्याने

Varsha Gaikwad too is obscene | वर्षा गायकवाड यांनाही अश्लील संदेश

वर्षा गायकवाड यांनाही अश्लील संदेश

मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, भाजपा आमदार विद्या चव्हाण, भाजपा नेत्या शायना एन. सी. यांच्यानंतर आता काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनाही अश्लील संदेश आल्याने राजकीय वर्तुळात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईत आमदारांना अश्लील मेसेज येण्याचे प्रकरण गाजत असताना निवडणूक काळात आपल्यालाही अश्लील मेसेज आल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे कृत्य नाही, असे सांगत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. या प्रकरणात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनीही लक्ष देत सायबर सेलद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणामागेही जळगावच्या दीपक कुमार गुप्ताचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. नीलम गोऱ्हे आणि विद्या चव्हाण यांना मेसेज केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गायकवाड यांच्या प्रकरणातही त्याचाच सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Varsha Gaikwad too is obscene