प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण भागातील शाळांत विविध कार्यक्रम
By Admin | Updated: January 25, 2015 23:10 IST2015-01-25T23:10:05+5:302015-01-25T23:10:05+5:30
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त टेन मनोर परिसरातील शाळांत नाट्य, भाषण, क्रीडास्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार

प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण भागातील शाळांत विविध कार्यक्रम
मनोर : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त टेन मनोर परिसरातील शाळांत नाट्य, भाषण, क्रीडास्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असून टेन ग्रामपंचायत कार्यालय येथे ७.१५ वा. झेंडा फडकविण्यात येणार आहे.
या वेळी राष्ट्रगीत तसेच शाळकरी मुलांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मनोर पोलीस ठाणे, वनविभाग कार्यालय तसेच यशवंत चौकेकर विद्यालय, अलि अल्लाना हायस्कूल असे अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)