- मनोहर कुंभेजकर
मुंबई - भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि, २५ डिसेंबर ते दि,२९ डिसेंबर या कालावधीत कांदिवली पश्चिम चिकू वाडी येथे खेळ महोत्सव आयोजित केला आहे.
उद्या २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कांदिवली पूर्व आकुर्ली मेट्रो स्टेशन समोरील "स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया येथे" उभारलेल्या भारतरत्न अटलजींच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून कार्यक्रमाची सुरवात होईल. याच दिवशी सायंकाळी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुंबईतील मंत्री व आमदारांचा सत्कार व कवी संमेलनाचे अयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत रत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म शताब्दी निमित्ताने याच संकुलात खेल महोत्सव आयोजित केला असून पुरुष आणि महिला यांच्या प्रत्येकी ३२ नामवंत संघ कब्बडी व क्रिकेट सामने खेळणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे खेळाचे आयोजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कांदिवली पश्चिम,चिकू वाडी येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा उद्या २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता प्रमोद महाजन यांच्या कन्या व माजी खासदार पूनम महाजन यांच्या शुभ हस्ते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या सह येथील महायुतीचे आमदार लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित राहणार आहे.
१५ एकर जागेवर असलेल्या प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या ठिकाणी २ किमी चा जोगर्स ट्रॅक व आंतर राष्ट्रिय स्तराचे फिफा फुटबॉल ग्राउंड विकसित होत असून याच मैदानावर टप्प्या टप्प्यात तरण तलाव, विवीध खेळासाठी इनडोअर स्टेडियम विकसित करण्याच्या गोपाळ शेट्टी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवला.
स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या येथील क्रीडा संकुलात पुढे हॉकी सारखा खेळ खेळला जाण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन त्यांनी केले. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्यासाठी खा पियुष गोयल यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व उत्तर मुंबईला "आंतर राष्ट्रीय खेळ हब" बनवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खेळ महोत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उत्तर मुंबई तसेच मुंबई च्या क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असेही आवाहन शेट्टी यांनी केले.