षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: July 6, 2015 23:10 IST2015-07-06T23:10:22+5:302015-07-06T23:10:22+5:30
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा मंगळवारी (७ जुलै) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अलिबागेत अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे

षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम
अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा मंगळवारी (७ जुलै) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अलिबागेत अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दिवसभर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकापचे जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे यांनी केले आहे.
आ. जयंत पाटील यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त अलिबागमध्ये शेतकरी भवनसमोर सकाळी दहा वाजता भव्यदिव्य असा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी माजी आ. मीनाक्षी पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. पंडित पाटील, आ. धैर्यशील पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अगोदर सकाळी नऊ वाजता हॉटेल मॅपल आयव्हीचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा आ. पंडित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)