वनहक्क दावे अखेर मंजूर

By Admin | Updated: April 1, 2015 22:27 IST2015-04-01T22:27:53+5:302015-04-01T22:27:53+5:30

आदिवासींना वनहक्क कायद्याने वनजमिनी मिळणार असल्याने, खालापूर तालुक्यातील आदिवासींना आता वनजमिनींचा वापर करता येणार आहे

Vanhak claim is finally approved | वनहक्क दावे अखेर मंजूर

वनहक्क दावे अखेर मंजूर

खालापूर : आदिवासींना वनहक्क कायद्याने वनजमिनी मिळणार असल्याने, खालापूर तालुक्यातील आदिवासींना आता वनजमिनींचा वापर करता येणार आहे. एकट्या खालापूर तालुक्यातील हजारो हेक्टर वनजमीन आदिवासींच्या नावावर होणार असल्याने आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या वनजमिनींसाठी गेली दोन दशके आंदोलन करणाऱ्या शोषित जन आंदोलन संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जंगल भागात राहणारे आदिवासी आणि बिगर आदिवासी यांनी वनजमिनीवर आपला हक्क सांगितल्याने त्यासाठी गेली काही वर्षे देशभर वनजमिनींसाठी सामाजिक संघटनांकडून लढा सुरू असताना राज्यभर शोषित जन आंदोलनाच्या माध्यमातून देखील वनजमिनींसाठी अनेकदा आदिवासींनी आंदोलन केले. खालापूर तालुक्यातील वनहक्क समितीने आपल्या परिपूर्ण प्रस्तावानुसार सामूहिक दावे सादर केले असल्याने त्यासाठीची विभागीय पातळीवरून खालापूर तालुक्यातील दहा सामूहिक दाव्याना मंजुरी दिल्याने आदिवासींना वनजमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा पातळीवरील समितीकडून अशा सामूहिक दाव्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर मागणी केलेल्या जमिनी शासन आदिवासींना वनजमीन देते. त्यानुसार खालापूर तालुक्यातील नदोडे आदिवासी वाडी, उंबरे आदिवासी वाडी, खाम्बेवाडी, टेंबेवाडी, गोहेवाडी, नारंगी दत्तवाडी, कलोते रयति ठाकूर वाडी, आडोशी जंगम वाडी, ढेकू आदिवासी वाडी, रानसई आदिवासी वाडीमधील दहा सामूहिक दाव्यांची पडताळणी करून हे सर्व दावे उपविभागीय वनहक्क समितीचे प्रमुख कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या समितीने मान्य करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले असल्याने या आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांना वनजमिनिवीवर हक्क प्राप्त होणार असल्याने एक हजाराच्या वरती वनजमीन या कायद्यान्वये आदिवासींना मिळणार असल्याने वनहक्क समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना अनेक आदिवासींनी बोलून दाखवली. (वार्ताहर)

Web Title: Vanhak claim is finally approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.