वज्रेश्वरी पाणी योजना कालबाह्य
By Admin | Updated: September 29, 2014 01:48 IST2014-09-29T01:48:39+5:302014-09-29T01:48:39+5:30
ज्रेश्वरी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेमध्ये वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीन मुख्य तीर्थक्षेत्रांसह परिसरातील गावपाड्यांचा समावेश होतो

वज्रेश्वरी पाणी योजना कालबाह्य
वज्रेश्वरी : वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली या तीर्थक्षेत्री वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना आणि भाविक पर्यटकांना सुमारे ४० वर्षे जुन्या कालबाह्य झालेल्या नादुरुस्त असलेल्या वज्रेश्वरी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून अशुद्ध आणि कमी पाणीपुरवठा होत आहे. यामुळे ही योजना नव्याने कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वज्रेश्वरी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेमध्ये वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीन मुख्य तीर्थक्षेत्रांसह परिसरातील गावपाड्यांचा समावेश होतो. दिवसेंदिवस या भागातील लोकसंख्या आणि भाविक पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामानाने सदर पाणीपुरवठा योजना नागरिकांची तहान भागवण्यात असमर्थ ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेली ही योजना सुमारे ४० वर्षे जुनी असून २००० साली तिची मुदत संपली आहे. तरीही, ती आजपर्यंत चालू ठेवण्यात आली आहे. अकलोली या ठिकाणी शुद्धीकरणासाठी एकूण ६ संच आहेत. परंतु, ते कित्येक वर्षे बंदावस्थेत होते. त्यामुळे फक्त तुरटी आणि टीसीएल पावडरचा वापर करून पाणी शुद्धीकरण होते. दरम्यान, यंदा मार्च महिन्यामध्ये त्यापैकी ४ संचांची दुरुस्ती करण्यात आली. यापैकी फक्त ३ संच कार्यान्वित झाले आहेत. परंतु, त्यांची शुद्धीकरण क्षमता कमी आहे.