वाशीतील वसाहतीला घरघर
By Admin | Updated: August 8, 2014 00:14 IST2014-08-08T00:14:24+5:302014-08-08T00:14:24+5:30
शहराची निर्मिती करताना सिडकोने सर्वप्रथम वाशी नोडची निर्मिती केली. वाशीतील सेक्टर 1 ही या परिसरातीलच नव्हे, तर नवी मुंबईतील प्रथम वसाहत मानली जाते.

वाशीतील वसाहतीला घरघर
>कमलाकर कांबळे - नवी मुंबई
शहराची निर्मिती करताना सिडकोने सर्वप्रथम वाशी नोडची निर्मिती केली. वाशीतील सेक्टर 1 ही या परिसरातीलच नव्हे, तर नवी मुंबईतील प्रथम वसाहत मानली जाते. असे असले तरी सायबर सिटीतील या आद्य वसाहतीतील बहुतांशी इमारतींना घरघर लागली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना जीवमुठीत घेऊन जीवन कंठावे लागत आहे.
वाशी सेक्टर 1 येथे सिडकोने अल्प उत्पन्न गटासाठी बी टाईप, डी टाईप, सी1 आणि सी2 टाईप तसेच सेक्टर 2 मधील बी 2 टाईप या इमारती बांधल्या आहेत. सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतींची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. सध्या येथील बहुतांशी इमारती राहण्यास धोकादायक ठरल्या आहेत. इमारतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. भिंतींना भेगा पडल्या आहेत. जिन्याचे व छताचे प्लास्टर निखळण्याच्या घटना तर नेहमीच्याच झाल्या आहेत. काही इमारतींच्या सिलिंगचे स्टीलसुध्दा उघडे पडले आहे. प्रत्येक पावसाळय़ात स्लॅब निखळण्याच्या दहा ते बारा घटना घडतात. त्यामुळे प्रत्येक पावसाळय़ात येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सुदैवाने अशा दुर्घटनांत आतार्पयत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या इमारतींची सद्यस्थिती बघता भविष्यात तशी शक्यता नाकारता येत नाही. तीन दिवसांपूर्वी येथील बी 14 मधील एका घरातील छताचे फ्लास्टर निखळल्याने एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यापाश्र्वभूमीवर येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोडकळीस आलेल्या या इमारतींची पुनर्बाधणी करावी, अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. ठाणो जिल्हय़ाचे पालकमंत्री गणोश नाईक हे दहा वर्षापासून त्यासाठी आग्रही आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून अडीच एफएसआयसाठी राज्य शासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मात्र मागील दोन अडीच वर्षापासून सदरचा प्रस्ताव नगरविकास खात्यात धूळ खात पडून आहे. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
सिडको आणि नगरविकास खात्याच्या वेळकाढू धोरणामुळे येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक भरत नखाते यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री तसेच सिडकोच्या वरिष्ठ अधिका:यांना निवेदन देऊन येथील इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. सुदैवाने आतार्पयत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भविष्यात अशाप्रकारची एखादी घटना घडल्यास त्याला सिडको व नगरविकास खात्याला जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यहानीचा गुन्हा दाखल करावा, अशी विनंती नखाते यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
4वाशी सेक्टर 1 आणि सेक्टर 2 मध्ये सिडकोने बांधलेल्या जवळपास पंचेचाळीस इमारती आहेत. यातून सुमारे साडेपाच हजार कुटुंबे राहतात. विशेष म्हणजे यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. राहण्यास धोकादायक बनल्या आहेत. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. असे असतानाही महापालिकेने बी टाईप वसाहतीतील केवळ आठच इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. विशेष म्हणजे धोकादायक घोषित न केलेल्या इतर इमारतींचीच मोठय़ाप्रमाणात पडझड सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी सुध्दा येथील रहिवाशांत असंतोष पसरला आहे.