वाशीत आज मँगो मॅनिया महोत्सव

By Admin | Updated: May 8, 2016 02:59 IST2016-05-08T02:59:20+5:302016-05-08T02:59:20+5:30

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची चव जिभेवर रेंगाळणारी असून, मे महिना आणि आंबे हे एक चविष्ट समीकरण आहे. आंब्याच्या मोसमानिमित्त लोकमत सखी

Vaishat Today the Mango Mania Festival | वाशीत आज मँगो मॅनिया महोत्सव

वाशीत आज मँगो मॅनिया महोत्सव

नवी मुंबई : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची चव जिभेवर रेंगाळणारी असून, मे महिना आणि आंबे हे एक चविष्ट समीकरण आहे. आंब्याच्या मोसमानिमित्त लोकमत सखी मंच आणि नवी मुंबई मर्चंट जिमखाना तसेच सृष्टी आर्ट्स अ‍ॅण्ड इव्हेंट्सच्या वतीने ‘मँगो मॅनिया’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ८ मे रोजी वाशी सेक्टर १४ येथील मर्चंट जिमखाना या ठिकाणी संध्याकाळी ४ ते १० वाजेपर्यंत या महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
आंब्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ सादर करण्याची संधी महिलावर्गाला दिली जाणार आहे. मदर्स डेनिमित्त या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सखी मंच या व्यासपीठाच्या सर्व महिला सभासदांना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. या महोत्सवात संध्याकाळी संगीत संध्या आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्वान महिलांचा सत्कार केला जाणार असून, महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही या ठिकाणी मांडले जाणार आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Vaishat Today the Mango Mania Festival