मुंबईत उद्या केवळ महिलांसाठी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:06 IST2021-09-26T04:06:44+5:302021-09-26T04:06:44+5:30

मुंबई : मागील आठवड्यात महापालिकेने राबविलेल्या महिला विशेष लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात एक लाख २७ हजार महिलांचे ...

Vaccination for women only in Mumbai tomorrow | मुंबईत उद्या केवळ महिलांसाठी लसीकरण

मुंबईत उद्या केवळ महिलांसाठी लसीकरण

मुंबई : मागील आठवड्यात महापालिकेने राबविलेल्या महिला विशेष लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात एक लाख २७ हजार महिलांचे लसीकरण त्या दिवशी झाले होते. त्यामुळे सोमवारी पालिका आणि सरकारी केंद्रांवर सकाळी १० ते ६ या वेळेत फक्त महिलांसाठी लसीकरण केले जाणार आहे.

मुंबईतील १८ वर्षांवरील ९५ लाख नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ३७ लाख ४६ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष लाभार्थींच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे महिलांना लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिका प्रशासनाने ही मोहीम सुरू केली आहे. १७ सप्टेंबर रोजी पहिल्या वेळेस ही मोहीम राबविली असता पालिका आणि सरकारी केंद्रांवर एक लाख सात हजार महिलांनी लस घेतली होती, तर खासगी केंद्रे मिळून एक लाख २७ हजार महिलांनी लस घेतली होती. सोमवारी महिलांना लस घेण्याकरिता थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

Web Title: Vaccination for women only in Mumbai tomorrow