राज्यात १ कोटी ८० लाखांहून अधिक लाभार्थींचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:09+5:302021-05-11T04:06:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात रविवारी १ लाख १० हजार ४४८ लाभार्थींना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

Vaccination of more than 18 million beneficiaries in the state | राज्यात १ कोटी ८० लाखांहून अधिक लाभार्थींचे लसीकरण

राज्यात १ कोटी ८० लाखांहून अधिक लाभार्थींचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात रविवारी १ लाख १० हजार ४४८ लाभार्थींना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ८० लाख ८८ हजार ४२ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ४ लाख ३६ हजार ३०२ लाभार्थींना लस देण्यात आली.

राज्यात सर्वाधिक लसीकरण मुंबईत २७ लाख ४८ हजार ६८३ एवढ्या लाभार्थींचे करण्यात आले. त्याखालोखाल, पुण्यात २४ लाख ४३ हजार १०९, नागपूरमध्ये ११ लाख ४ हजार ७३५ , ठाण्यात १४ लाख ७ हजार ५१८, नाशिकमध्ये ८ लाख२६ हजार ८४१ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले.

* आतापर्यंत झालेले लसीकरण

कर्मचारी - पहिला डोस - दुसरा डाेस

आराेग्य कर्मचारी - ११,२७,३४१ - ६,६८,९०१

फ्रंटलाइन कर्मचारी - १५,०४,५७८ - ६,१९,६२२

सामान्य लाभार्थी - १,२१,००,४१० - २०,६७,१९०

------------------------------

Web Title: Vaccination of more than 18 million beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.