राज्यात २ कोटी १३ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:05 IST2021-05-28T04:05:59+5:302021-05-28T04:05:59+5:30

मुंबई : राज्यात दिवसभरात १ लाख ३४ हजार ५७७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १३ ...

Vaccination of 2 crore 13 lakh beneficiaries in the state | राज्यात २ कोटी १३ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

राज्यात २ कोटी १३ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई : राज्यात दिवसभरात १ लाख ३४ हजार ५७७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १३ लाख ५२ हजार ३३२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख ८२ हजार ३०१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत १८ लाख ८८ हजार ७३२ लाभार्थ्यांना, २४ लाख ४९ हजार ४९७ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६२ लाख ३१ हजार ८०२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यात मुंबईत ३१ लाख ८ हजार ३२६, नागपुरात १२ लाख ६६ हजार ९७०, ठाण्यात १६ लाख २१ हजार ७६४ तर पुण्यात २७ लाख ५ हजार ५५५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

Web Title: Vaccination of 2 crore 13 lakh beneficiaries in the state