Vaccinated 51,650 employees in three sessions in the state | राज्यात तीन सत्रांत ५१ हजार ६५० कर्मचाऱ्यांना लस

राज्यात तीन सत्रांत ५१ हजार ६५० कर्मचाऱ्यांना लस

राज्यात तीन सत्रांत ५१ हजार ६५० कर्मचाऱ्यांना लस

दिवसभरात १८ हजार १६६ लाभार्थ्यांनी घेतला डोस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचे प्रमाण ६८ टक्के आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ३१२ जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली असून, आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली.

राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवारी - बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात बुधवारी सर्वाधिक लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले असून, हे प्रमाण ७७ टक्के आहे. ठाण्यात एकूण १ हजार ७७४ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर त्याखालोखाल मुंबईत १ हजार ७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे, हे प्रमाण शहरात ६१ आणि उपनगरात ८२ टक्के इतके आहे. पुण्यात १ हजार १०९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असून हे प्रमाण ३८ टक्के आहे. राज्यातील काही केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.

लसीकरणाची आकडेवारी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) :

अकोला (२२४, ७५ टक्के), अमरावती (५५८, ११२ टक्के), बुलडाणा (४५८, ७६ टक्के), वाशिम (२२१, ७४ टक्के), यवतमाळ (३६३, ७३ टक्के), औरंगाबाद (३१०, ३१ टक्के), हिंगोली (२१४, १०७ टक्के), जालना (२७९, ७० टक्के), परभणी (२८४, ७१ टक्के), कोल्हापूर (७७८, ७१ टक्के), रत्नागिरी (२९०, ५८ टक्के), सांगली (४३५, ४८ टक्के), सिंधुदुर्ग (१७९, ६० टक्के), बीड (३५८, ७२ टक्के), लातूर (४७३, ७९ टक्के), नांदेड (३२३, ६५ टक्के), उस्मानाबाद (२४०, ८० टक्के), मुंबई (६६६, ६१ टक्के), मुंबई उपनगर (१०६२, ८२ टक्के), भंडारा (२४१, ८० टक्के), चंद्रपूर (४३२, ७२ टक्के), गडचिरोली (१८५, ४६ टक्के), गोंदिया (२२३, ७४ टक्के), नागपूर (९२१, ७७ टक्के), वर्धा (५४३, ९१ टक्के), अहमदनगर (६८३, ५७ टक्के), धुळे (३६६, ९२ टक्के), जळगाव (५२३, ७५ टक्के), नंदुरबार (३१३, ७८ टक्के), नाशिक (९३२, ७२ टक्के), पुणे (११०९, ३८ टक्के), सातारा (८४०, ७६ टक्के), सोलापूर (८६९, ७९ टक्के), पालघर (५५८, ९० टक्के), ठाणे (१७७४, ७७ टक्के), रायगड (१३९, ३५ टक्के).

...............

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vaccinated 51,650 employees in three sessions in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.