राज्यात साडेतीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:24+5:302021-02-05T04:32:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकऱण प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ ...

Vaccinate more than three and a half lakh health workers in the state | राज्यात साडेतीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

राज्यात साडेतीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकऱण प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. राज्यात बुधवारी ५५५ लसीकरण सत्रात दिवसभरात ५७ हजार ७५८चे लक्ष्य होते, त्यापैकी ३५ हजार ८८९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, एकूण ६२ टक्के लसीकरण पार पडले. यात ३५ हजार ९६ आरोग्य कर्मचारी, तर ७९३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. ३५ हजार ४८१ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर ४०८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले.

राज्यात दिवसभरात अकोला आणि भंडारा जिल्ह्यांत १००हून अधिक टक्के लसीकरण झाले, यात अकोला जिल्ह्यात ३०० लाभार्थ्यांचे लक्ष्य होते, तर ३२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर भंडारामध्ये १०१ टक्के लसीकरण झाले. भंडाऱ्यात ७००चे उद्दिष्ट होते, त्यात ७०४ लाभार्थ्यांनी लस घेतली. परभणी, हिंगोली, सांगली, बुलडाणा, बीड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत दिवसभरात ५० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण करण्यात आले.

कोव्हॅक्सिनचे दिवसभरात ४०८ लाभार्थी

राज्यात अमरावती जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा सर्वाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला, या जिल्ह्यात १०० जणांचे लक्ष्य होते, त्यात ११३ जणांनी लस घेतली. तर एकूण १ हजार १०१ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर पुण्यात ७६, नागपूर १२०, औरंगाबाद ५६, मुंबई ४०, सोलापूर ३ लाभार्थ्यांनी लस घेतली. राज्यात आतापर्यंत ३ हजार ५८५ लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

राज्यात अग्रक्रमी असणाऱ्या पाच जिल्ह्यांतील लसीकरणाची आकडेवारी

जिल्हा लसीकरण लाभार्थी

मुंबई उपनगर ३८ हजार ४४४

ठाणे ३४ हजार २४७

पुणे ३२ हजार ४६८

मुंबई शहर १९ हजार १४१

नागपूर १६ हजार ३३६

Web Title: Vaccinate more than three and a half lakh health workers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.