राज्यात दिवसभरात ८ लाख ४९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:51+5:302021-09-02T04:12:51+5:30

मुंबई : राज्यात मंगळवारी ८ लाख ४९ हजार ८२ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ५ ...

Vaccinate more than 8 lakh 49 thousand beneficiaries in a day in the state | राज्यात दिवसभरात ८ लाख ४९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लस

राज्यात दिवसभरात ८ लाख ४९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लस

मुंबई : राज्यात मंगळवारी ८ लाख ४९ हजार ८२ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ५ कोटी ९० लाख ६६ हजार ९०२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ९१ लाख ५४ हजार ६०६ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २१ लाख ९० हजार १४२ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ४८ लाख २५ हजार ५७४ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी १३ लाख ३५ हजार ५८६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९२ हजार ५५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ९ लाख ९७ हजार ८०६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ३९ हजार ८४८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १४ लाख ७३ हजार ७८३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Web Title: Vaccinate more than 8 lakh 49 thousand beneficiaries in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.