सुट्यांची ‘पर्यटन पर्वणी’
By Admin | Updated: August 13, 2015 00:46 IST2015-08-13T00:46:31+5:302015-08-13T00:46:31+5:30
शनिवारी स्वातंत्र्य दिनाची सुटी, त्यानंतर रविवार आणि मंगळवारी पुन्हा पतेतीची सुटी. त्यामुळे सोमवारी रजा घेऊन अनेक मुंबईकरांनी चार दिवसांच्या सुटीची पर्वणी साधली आहे.

सुट्यांची ‘पर्यटन पर्वणी’
मुंबई : शनिवारी स्वातंत्र्य दिनाची सुटी, त्यानंतर रविवार आणि मंगळवारी पुन्हा पतेतीची सुटी. त्यामुळे सोमवारी रजा घेऊन अनेक मुंबईकरांनी चार दिवसांच्या सुटीची पर्वणी साधली आहे. अनेकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले आहेत.
अनेकांनी विमान, खासगी बस आणि रेल्वेची तिकिटे काढली आहेत. विमान कंपन्यांकडून विशेष पॅकेज देण्यात आले असून खासगी ट्रॅव्हल्सकडून मात्र तिकिटांत वाढ करण्यात आली आहे.
केसरी टूर्सचे शैलेश पाटील यांनी सांगितले की, अनेकांनी सिंधुदुर्ग, तारकर्ली, महाबळेश्वर, अलिबाग, गोवा, बंगळुरू, लेह, श्रीनगरला जाण्याचे नियोजन केले आहे. भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांमध्ये सिंगापूर, थायलंडला पसंती देण्यात आली आहे. काहींनी ट्रेकिंगचाही पर्याय निवडला आहे.
एअर इंडिया, जेट एअरवेज, स्पाइसजेट, एअरएशिया, इंडिगो आणि गो-एअर अशा निरनिराळ्या विमानसेवा कंपन्यांनी विशेष ‘फ्रीडम सेल’ आणि ३० टक्के सवलत योजना सुरू केल्या आहेत. १२ ते १४ आॅगस्ट दरम्यान बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना विविध योजनांचा लाभ घेता येईल. स्पाइसजेटने देशांतर्गत सेवेत १०० टक्के सवलत दिली आहे. तर ब्रिटिश एअरवेजने लंडन व उत्तर अमेरिकेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सूट दिली आहे. एअर इंडियाने प्रवाशांना विशेष पॅकेजसह अतिरिक्त सामान नेण्याची मुभा दिली आहे. जेट एअरवेजन ३० टक्के सवलत दिली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या राज्यातील विविध पर्यटनस्थळी जाण्यासाठी अवाच्या सवा दर आकारत आहेत. प्रत्येक तिकिटासाठी जवळपास २00 ते ५00 रुपये अधिक मोजावे लागणार असल्याचे एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.