मतदानासाठी भरपगारी सुटी
By Admin | Updated: October 13, 2014 22:42 IST2014-10-13T22:42:33+5:302014-10-13T22:42:33+5:30
रायगड जिल्हय़ातील विविध कंपन्या, हॉटेल्स, दुकानांत काम करणा:या कामगारांना पगारी सुटी देण्याच्या सूचना कामगार विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

मतदानासाठी भरपगारी सुटी
पनवेल : रायगड जिल्हय़ातील विविध कंपन्या, हॉटेल्स, दुकानांत काम करणा:या कामगारांना पगारी सुटी देण्याच्या सूचना कामगार विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्हयातील सुमारे 1क्क्क् आस्थापने बुधवारी कामगारांना पगारी सुटी देणार आहेत. मतदान करून कामावर आलेल्यांना सवलत देण्यात येणार आहे. यासंदर्भात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे व सहाय्यक कामगार आयुक्त शाम जोशी यांनी दिले आहेत.
रायगड जिल्हय़ात तळोजा, पाताळगंगा, नागोठणो, रोहा, महाड या औद्योगिक वसाहती आहेत, त्याचबरोबर जेएनपीटी परिसर व अनेक वेअर हाऊस आहेत. दुकान, मॉल आणि छोटे मोठे कारखानेही या भागात आहेत. या ठिकाणी मोठय़ा संख्येने कामगार काम करतात. मतदानादिवशी संबंधित कामगारांना पगारी सुटी देण्यासंदर्भात शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार बहुतांश कंपन्यांना बुधवारी आपल्या कामगारांना सुटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा फायदा क्षेत्रत काम करणारे सुमारे 5क् हजारांपेक्षा जास्त कामगारांना पगारी सुटी घेऊन मतदान करता येणार आहे. कामगार विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याबाबतही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त शाम जोशी यांनी सांगितले. (वार्ताहर)
गावीही जाता येणार
खाजगी क्षेत्रत काम करणा:यांना मतदानासाठी एका दिवसाची पगारी सुटी देण्यात यावी, असे आदेश उद्योग व ऊर्जा कामगार विभागाने जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामगारांना मतदान करता यावे, यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. बुधवारी अनेक कामगारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्याचबरोबर काहींना आपले मूळ गाव गाठून त्या ठिकाणी मतदान करता येणार आहे.