बदलापूर नगराध्यक्षपदी उषा म्हात्रे
By Admin | Updated: September 5, 2014 02:20 IST2014-09-05T02:20:17+5:302014-09-05T02:20:17+5:30
राष्ट्रवादीला रामराम करून आमदार किसन कथोरे भाजपाच्या वाटेवर गेल्याने बदलापुरातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले होते.

बदलापूर नगराध्यक्षपदी उषा म्हात्रे
बदलापूर : राष्ट्रवादीला रामराम करून आमदार किसन कथोरे भाजपाच्या वाटेवर गेल्याने बदलापुरातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले होते. त्याच गरमागरमीत बदलापूर नगरपरिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शिवसेनेच्या उषा म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही निवडणूक जाहीर होण्याआधीच सुरु झाल्याने बदलापुरातील राजकीय वातावरण चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेवर शिवसेना-भाजपाची सत्ता असून राष्ट्रवादी ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. युतीच्या गोटातून भाजपाच्या नगराध्यक्षा स्नेहा पातकर यांनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिका:यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. महिलांसाठी आरक्षित असलेल्या या पदावर शिवसेनेचा दावा असल्याने शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वहिनी उषा म्हात्रे यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी म्हात्रे यांनी आधीपासूनच तयारी केली होती. त्यांच्या या प्रय}ांना यशही आले. त्यानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उषा म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी त्या पद स्वीकारतील. त्या पदवीधर असून विकासात्मक निर्णय घेण्यात त्या कमी पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली. तर प्रभागापुरती मर्यादित न राहता शहर विकासाला प्राधान्य देऊ, अशी भूमिका उषा म्हात्रे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. (प्रतिनिधी)