Join us
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईसाठी प्रसंगी रोबोटही वापरा; महापौर रितू तावडे यांच्या प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:48 IST

३१ मेपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. महापौर रितू तावडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी नालेसफाईच्या कामांची पाहणी करत आहेत.

मुंबई : भूमिगत नाले आणि मोऱ्या यांची नियमित स्वच्छता करून सांडपाणी वाहून नेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रसंगी रोबोटिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

पावसाळापूर्व कामांमधील नाल्यांतील गाळ काढण्याची कामे

३१ मेपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. महापौर रितू तावडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी नालेसफाईच्या कामांची पाहणी करत आहेत.

महापाैर तावडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासमवेत पूर्व उपनगरांतील विविध ठिकाणी मंगळवारी पाहणी केली. यावेळी आवश्यक असेल तिथे रोबोटिक यंत्रणा वापरण्याच्या सूचना तावडे यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नाले स्वच्छतेची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. लोकप्रतिनिधींना नाले स्वच्छतेच्या कामांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता यावे व प्रगतीची माहिती सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले.

भांडुप पूर्व येथील उषानगर नालेस्वच्छता कामाची पाहणी केल्यानंतर संरक्षक भिंत उभारण्याची सूचना त्यांनी केली. मुलुंडमधील गव्हाणपाडा येथील बाउंड्री नाला, घाटकोपर येथील गारोडिया नगर मेट्रो स्थानकाखालील सोमय्या नाला, साकीनाका मेट्रो स्थानकाखालील नाला क्रमांक १० ची त्यांनी पाहणी केली.

गृहप्रकल्पासही दिली भेट

महापालिकेच्या वतीने मुलुंड पूर्व येथे प्रकल्पबाधितांसाठी सात हजार ५०० सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या गृहप्रकल्पाला भेट देत सदनिकांची पाहणी करून  हा गृहप्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून प्रकल्पबाधितांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी सूचनाही महापाैर तावडे यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Use robots for drain cleaning: Mayor Ritu Tawde instructs administration.

Web Summary : Mayor Ritu Tawde instructed officials to use robotic systems for drain cleaning, especially in underground areas. She also ordered CCTV installation for inspection and directed swift completion of a housing project for affected residents.