Join us  

वाहिन्या निवडीच्या स्वातंत्र्याचा वापर करावा, ग्राहक पंचायत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 7:00 AM

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या नवीन नियमांमुळे केबल पाहणाऱ्या ग्राहकांना पसंतीची वाहिनी पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.

मुंबई : दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या नवीन नियमांमुळे केबल पाहणाऱ्या ग्राहकांना पसंतीची वाहिनी पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. २९ डिसेंबरपर्यंत याबाबत केबल आॅपरेटरना माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे केबल पाहणाºया ग्राहकांनी पसंतीच्या वाहिन्यांची नावे केबल व्यावसायिकांना २९ डिसेंबरपूर्वी कळवावी, असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर) चे औचित्य साधून ग्राहकांनी ट्रायच्या माध्यमातून मिळालेला निवडीचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्राहक संरक्षण दिनानिमित्त मुंबई ग्राहक पंचायत ‘चॅनेल माझ्या आवडीचे, स्वातंत्र्य मला निवडीचे’ ही मोहीम २४ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत राबवणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतीच्या अ‍ॅडव्होकसी व कॅम्पेन विभागप्रमुख वर्षा राऊत यांनी दिली. ट्रायने निश्चित केलेली विविध वाहिन्यांची दरपत्रिका व संबंधित सेवा पुरवठादारांचे संपर्क क्रमांक ग्राहकांना सोशल मीडियाद्वारे कळवण्यात येणार आहेत. याचा आधार घेत ग्राहकांनी पसंतीच्या वाहिन्यांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील ग्राहकांमध्ये जागृतीसाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ग्राहकांच्या हक्कांची जाणीव ठेवल्याबाबत ग्राहक पंचायतीने त्यांचे आभार मानले.२४ डिसेंबर १९८६ ला ग्राहक संरक्षण कायदा देशात अमलात आला. या कायद्याने ग्राहकाला जे सहा हक्क बहाल करण्यात आले आहेत त्यामध्ये निवडीचा हक्कदेखील देण्यात आला आहे. हाच हक्क बजावत दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) ग्राहकांनी पसंतीच्या वाहिन्यांची यादी पुरवठादाराला देऊन तेवढ्याच वाहिन्यांसाठी शुल्क द्यावे, असे स्पष्ट केले आहे.‘चॅनेल माझ्या आवडीचे, स्वातंत्र्य मला निवडीचे’केबल व्यावसायिक यापूर्वी नको असलेल्या वाहिन्याही ग्राहकांच्या माथी मारत होते व त्यासाठी महागडे पॅकेज घ्यावे लागत होते. मात्र, ट्रायने या प्रकाराला चाप लावला आहे. त्यानुसार ग्राहकांनी पसंतीच्या वहिन्यांची नावे आपल्या केबल व्यावसायिकांना व सेवा पुरवठादारांना २९ डिसेंबरपर्यंत कळवावीत, असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी ‘चॅनेल माझ्या आवडीचे, स्वातंत्र्य मला निवडीचे’ या मोहिमेअंतर्गत केले आहे.

टॅग्स :भारत