कृत्रिम पावसाचा प्रयोग पालिकेने गुंडाळला

By Admin | Updated: August 3, 2014 00:53 IST2014-08-03T00:53:19+5:302014-08-03T00:53:19+5:30

मुसळधार पावसाने पाण्याचे टेन्शन मिटवल्यामुळे उर्वरित दहा टक्के पाणीकपात पुढच्या आठवडय़ात मागे होण्याची चिन्हे आहेत़

The use of artificial rain was suppressed by the corporation | कृत्रिम पावसाचा प्रयोग पालिकेने गुंडाळला

कृत्रिम पावसाचा प्रयोग पालिकेने गुंडाळला

मुंबई : मुसळधार पावसाने पाण्याचे टेन्शन मिटवल्यामुळे उर्वरित दहा टक्के पाणीकपात पुढच्या आठवडय़ात मागे होण्याची चिन्हे आहेत़ त्याचबरोबर तलावांतील जलसाठाही समाधानकारक वाढत असल्याने खोटा पाऊस पाडण्याचा प्रयोग अखेर रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आह़े
जुलैचा अखेरचा आठवडा मुंबईकरांसाठी लकी ठरला आणि एकाच आठवडय़ात पूर्ण वर्षभराचे पाणी संकट निवळल़े सलग पाच दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने तलावांची पातळी झपाटय़ाने वाढत आह़े त्यामुळे पालिकेने गेल्या बुधवारीच 2क् टक्क्यांपैकी दहा टक्के पाणीकपात मागे घेतली होती़ आजच्या घडीला तलावामध्ये 8क् टक्के जलसाठा जमा झाला आह़े 
ऑक्टोबर अखेरीर्पयत तलावांमध्ये 12 लाख दशलक्ष लीटर जलसाठा असल्यास वर्षभराचे टेन्शन मिटणार आह़े त्यामुळे निविदा मागविल्या असल्या तरी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आता गरज नाही, असे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केल़े तसेच उर्वरित दहा टक्के पाणीकपात रद्द करण्याबाबत जलसाठय़ाचा सोमवारी आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 

 

Web Title: The use of artificial rain was suppressed by the corporation