Join us  

मुलुंडमध्ये आता २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 4:41 AM

दाब नियंत्रण झडपा बसवणार; काही भागांत पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल

मुंबई : मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग मुलुंडमध्ये करण्यात येत आहे़ यानिमित्त या विभागात दाब नियंत्रण झडपा कार्यान्वित करण्यात येणार आहेत़ त्यामुळे मंगळवारपोसून ३० सप्टेंबरपर्यंत मुलुंडमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत व दाबातही बदल करण्यात आले आहेत़दशकभरापूर्वी मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेने घेतला़ यासाठी वांद्रे आणि मुलुंड या दोन विभागांमध्ये प्रयोग करण्यात येत आहे़ मात्र, अद्याप या प्रयोगांना काही यश आलेले नाही़ मुलुंड या विभागात पाणीपुरवठा सतत सुरू राहण्यासाठी काही बदल करण्यात येत आहे़ त्यानुसार, दाब नियंत्रण झडपांची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. उद्यापासून हे काम सुरू होत असल्याने, या कालावधीत मुलुंड पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठ्याच्या कालावधीत व दाबात बदल होण्याची शक्यता आहे़ हा प्रयोग यशस्वी झाल्यास, संपूर्ण मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत़येथे पाणीपुरवठ्यावर परिणाममुलुंड पश्चिम येथील अमरनगर, राहुलनगर, न्यू राहुलनगर, शंकर टेकडी, हनुमान पाडा, मलबार हिल परिसर, स्वप्ननगरी, योगी हिल आणि इतर डोंगराळ भाग, मुलुंड कॉलनी, महानगरपालिकेच्या ट्रंक मेल व एल.बी.एस. मार्ग यांच्यामधील भाग, तसेच मुलुंड पूर्व भागातील देशमुख गार्डन, नानेपाडा आणि मुलुंड रेल्वेलगतच्या भागातील वसाहती या ठिकाणी पाण्याची वेळ अथवा दाबात बदल होणार आहे़

टॅग्स :पाणीमुंबई